बारामती तालुका
बारामती तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.
तालुक्यातील गावे
- आंबीबुद्रुक
- आंबीखुर्द
- अंजणगाव (बारामती)
- बाबुर्डी
- बजरंगवाडी
- बारामती ग्रामीण
- बऱ्हाणपूर (बारामती)
- भिलारवाडी (बारामती)
- भोंडवेवाडी
- चांदगुडेवाडी
- चौधरवाडी (बारामती)
- चोपडाज
- दांडवाडी
- देऊळगावरसाळ
- देऊळवाडी (बारामती)
- ढाकळे (बारामती)
- ढेकाळवाडी
- धुमाळवाडी (बारामती)
- डोर्लेवाडी
- गदादारवाडी
- गाडीखेळवाडी
- घाडगेवाडी (बारामती)
- गोजुबावी
- गुणवाडी
- होळ
- जैनकवाडी
- जाळकेवाडी मुधळे
- जळगाव कडेपठार
- जळगाव सुपे
- जाळोची
- जरडवाडी
- जोगवडी
- काळखैरेवाडी
- कामगळवाडी
- कांबळेश्वर
- कनाडवाडी
- कान्हेरी (बारामती)
- करंजे (बारामती)
- कारंजेपूल
- काऱ्हाटी
- कऱ्हावाघज
- कर्खेळ
- काटेवाडी (बारामती)
- काटफाळ
- खडुखैरेवाडी
- खांडज (बारामती)
- खंडोबाचीवाडी (बारामती)
- खराडेवाडी
- कोळोली
- कोऱ्हाळे बुद्रुक
- कोऱ्हाळे खुर्द
- कुरणेवाडी
- कुतवालवाडी
- लाटे
- लोणी भापकर
- मगरवाडी (बारामती)
- मळद (बारामती)
- माळेगाव बुद्रुक
- माळेगाव खुर्द
- माळशिकारेवाडी
- मालवडी
- मानाप्पावस्ती
- मसाळवाडी
- मेडद (बारामती)
- मेखळी
- मोढवे
- मोरळवाडी
- मोरगाव
- मुढाळे
- मुरती (बारामती)
- मुरूम (बारामती)
- नारोळी
- नेपाटवळण
- निंबोडी (बारामती)
- निंबूट
- निरवागज
- पळशीवाडी
- पणदरे
- पांढरवाडी (बारामती)
- पानसरेवाडी
- पारवडी (बारामती)
- पवनीमाळ
- पवनेवाडी
- पिंपळेवस्ती
- पिंपळी (बारामती)
- रूई (बारामती)
- साबळेवाडी (बारामती)
- सदोबाचीवाडी
- सांगवी (बारामती)
- सस्तेवाडी
- सावळ (बारामती)
- सावंतवाडी (बारामती)
- सायंबाचीवाडी
- शेरेचीवाडी
- शिरावळी (बारामती)
- शिर्सुफळ
- शिरसाणे
- सोनगाव (बारामती)
- सोनकसवाडी
- सोनवडी सुपे
- सोरटेवाडी
- सुपे (बारामती)
- तांदुळवाडी (बारामती)
- तरडोली
- थोपटेवाडी
- उंबरवाडी (बारामती)
- उंदवडी कडेपठार
- उंदवडी सुपे
- वडगाव निंबाळकर
- वढाणे
- वंजारवाडी (बारामती)
- वाघळवाडी
- वाकी (बारामती)
- वाणेवाडी (बारामती)
- येळेवस्ती
- झारागडवाडी
भौगोलिक
हा पुणे जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागात वसलेला कमी पावसाचा तालुका आहे.बारामती तालुक्याच्या पूर्वेस इंदापूर तालुका,पश्चिमेस सासवड तालुका,उत्तरेला दौंड तालुका आणि दक्षिणेस सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका आहे.बारामती तालुक्यामधून निरा डावा कालवा व निरा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यामुळे बारामती तालुक्याचा दक्षिण भाग बागायती भाग म्हणून ओळखला जातो आणि इथे ऊसाचे उत्पादन जास्त घेतले जाते.त्यामुळे या ठिकाणी तीन साखरकारखाने आहेत. बारामती तालुका 18°04΄ ते 18°32΄ उत्तर अक्षांश आणि 74°26΄ ते 74°69΄ पूर्व रेखांश दरम्यान आहे. हा भाग समुद्र सपाटी पासून 550 मीटर उंचीवर आहे. बारामती तहसीलचे क्षेत्रफळ १३८२ किमी२आहे. तहसील विभागात एकशे सोळा मुख्य गावे आणि इतर छोटी उप-गावे आहेत. तालुक्याची एकूण लोकसंख्या ४,३०,०१० आहे.यापैकी पुरुषांची संख्या 2,21,626 व माहिलांची संख्या 2,08,384 आहे. ग्रामीण भागाची लोकसंख्या 8२.84% आहे (संदर्भ: भारताची जनगणना, २०११).
शेती
लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती असून बाजरी, गहू, ज्वारी, ऊस, द्राक्षे ,मकाआणि कापुस ही इथली महत्त्वाची पिके आहेत. कापुस आणि साखरेची येथून निर्यात मोठ्या प्रमाणात होते.आणि जिरायती भागात डाळिंब, इतर् कडधान्ये पिकवली जातात.त्यामधे हरभरा,चवळी,मुग,वाटाना, मटकी ही कडधान्ये घेतली जातात.
पर्यावरण
बारामती तालुक्यातील सिंचनाच्या आणि बिगर सिंचनाच्या क्षेत्राचे वातावरण थोडे वेगळे आहे. हिवाळा डिसेंबर ते फेब्रुवारीच्या मध्यभागी असतो आणि त्यानंतर मे पर्यंत टिकणारा उन्हाळा असतो. जून ते सप्टेंबर हा नै -त्य मॉन्सून हंगाम असतो तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा मान्सूननंतरचा हंगाम असतो. सरासरी किमान तापमान सुमारे 12 अंश सेल्सियस आहे आणि अधिकतम तापमान सुमारे 39 अंश सेल्सियस आहे. बारामती तहसीलच्या 2001 ते 2012 या कालावधीत सरासरी वार्षिक पाऊस 502 मिमी होता. पावसाचे विश्लेषनावरून बारामती तालुका दुष्काळ क्षेत्र असल्याचे दर्शवते. या तालुक्यात अनेक पशुपक्षी आढळतात. येथील ढेलेवस्ती-गुनवडी जवळील कऱ्हा (Karha) नदीचा काठ मोरांसाठी प्रसिद्ध आहे.
भूगर्भातील जल संसाधने व स्वच्छता गृहांची उपलब्धता
बारामती तहसील क्षेत्राची निव्वळ वार्षिक भूजल उपलब्धता प्रति वर्ष १५९६० हेक्टर मीटर/वर्ष आहे. यापैकी सिंचनासाठी १५१६० हेक्टर मीटर/वर्ष वापरले जाते तसेच घरगुती व औद्योगिक वापरासाठी २३६. हेक्टर मीटर/वर्ष असा वापर होतो. भविष्यातील पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी भविष्यातील भूजल पुनर्भरण करणे आवश्यक आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भूजल व्यवस्थापन पद्धती केल्या पाहिजेत. या क्षेत्रात 14,104 विहिरी आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने बोअरवेलचा वापर शेती व घरगुती उद्देशाने भूगर्भातील पाणी काढण्यासाठी केला जातो.
बारामती तहसील क्षेत्रात ४२% कुटुंबे शुद्धीकरण प्रक्रिया केलेले पाणी पिण्यासाठी वापरतात, तर १७% कुटुंबांना शुद्धीकरण प्रक्रिया न केलेले पाणी पिण्यासाठी मिळते. १५. ४% कुटुंबे विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरतात तर १९.6% कुटुंबे बोरवेल / ट्यूबवेल, हॅंडपंपमधून पिण्याचे पाणी वापरतात.
बारामती तहसीलच्या ग्रामीण भागात ३२.१२% कुटुंबांना स्वच्छताविषयक सुविधा उपलब्ध नाहीत, ते उघड्यावर स्वच्छतागृहाचा वापर करतात. केवळ 39.8% कुटुंब अत्याधुनिक सेनेटरी सुविधा वापरतात[१]
झाडोरा
या तालुक्यातील महत्त्वपूर्ण झाडोरा हा काटेरी झुडुपी जंगल या प्रकारांतर्गत मोडते. महत्त्वाच्या वनस्पतीत बोर, वड, बाभूळ, आंबा,लिंब, हिवर इत्यादी वनस्पतींचा समावेश होतो.
इतिहास
श्री मयुरेश्वर - मोरगाव
निजे भूस्वानंदे जडभरत भूम्या परतरे । तुरियास्तीरे परमसुखदेत्व निवससि ।। मयुराया नाथा तवमसिच मयुरेश भगवान । अतस्त्वा संध्याये शिवहरिरणी मयुरेश ब्रम्हजनकम ।।१।।
अर्थात – हे मयुरेशा, तू सर्वश्रेष्ठ अशा भूस्वानंद क्षेत्रात जडभरतमुनिच्या भुमीमध्ये, कऱ्हा नदीच्या तीरावर असलेल्या मोरगाव या सुखदायी क्षेत्रात वास करतोस. तुरिया अवस्थेत असल्यामुळे शिवशंकरांना तू ब्रम्हानंद देतोस. हे मयुरेश्वरा, मयूर हे आसन आसणाऱ्या तुला माझा नमस्कार. ब्रम्हदेवाने उभारलेल्या तुझ्या ह्या देवळात दक्षिणेस रक्षणासाठी शंकर व उत्तरेला सूर्य सिद्ध केले आहे.
गाणपत्य सांप्रदायाच्या साडेतीन पीठांपैकी आद्यपीठ, मोरगाव कऱ्हा नदीच्या काठावर वसलेले आहे.अष्टविनायक यात्रा प्रथेप्रमाणे येथील श्री मयुरेश्वराचे (मयुरेश्वर) दर्शन घेऊनच यात्रा सुरू केली जाते व सर्व अष्टविनायकांचे दर्शन घेऊन पुन्हा मोरेश्वराचे दर्शन घेतल्यावर ती संपूर्ण झाली असे समजले जाते. मयुरेश्वराचे मंदिर उंच तटबंदीने वेढलेले असून उत्तराभिमुख आहे. पायऱ्या चढून गेले की नगारखाना खाली पुढच्या दोन भागात लाडू घेऊन गणेशाकडे तोंड करून उभा असलेला दगडी मुषकराज आहे. त्याच्या पुढील चौथऱ्यावर येथील वैशिष्ठ म्हणजे नंदी आहे. त्याबद्दल असे सांगितले जाते की, मोरगावच्या जवळच असणाऱ्या शिवमंदीरात स्थापन करण्याकरीता गाडय़ावरून नंदी नेत असता अचानक गाडा मोडला आणि नंदी त्या ठिकाणी जो बसला तो काही केल्या हलेचना. पुढे एका कारागिराच्या स्वप्नात येऊन नंदीने मला येथून हलवू नका म्हणून दृष्टांत दिला. चौथऱ्यांच्या पुढे सभामंडप आहे. सभामंडपाच्या भोवती तटबंदीच्या आतील चौकात आठ दिशांना गणेशाच्या एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नहर्ता, विघ्वराज, धूम्रवर्ण व वक्रतुण्ड अशा नावाच्या अष्टप्रतिमा आहेत. सभामंडपातनंतर गाभारा लागतो.
सुखहर्ता दुखहर्ता..... ही आरती समर्थ रामदास स्वामींस ज्यांच्या दर्शनाने स्फुरली ती, मोरेश्वराची मनोहारी मूर्ती सभामंडपातूनच लक्ष वेधून घेते. मूर्ती पूर्वाभिमुख डाव्या सोंडेची असून मुर्तीच्या डोळ्यात आणि बेंबीत हिरे आहेत. श्रीच्या मस्तकावर नागराजाचा फणा पसरलेला आहे. तसेच त्याच्या डाव्या उजव्या बाजूस ऋद्धी - सिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत.
अख्यायिका - गंडकी नगराचा राजा चक्रपाणी याला सुर्याउपासनेतून पुत्र प्राप्ति झाली. त्याचे नाव त्याने सिंधू असे ठेवले. सिंधूने सुद्धा सुर्यदेवाची तपश्चर्या करून अमरत्वाचा वरदान मिळवला. परंतु वरदान मिळताच सिंधूराज उन्मत झाला. त्रिलोकाच्या लालसेने त्याने पृथ्वी जिंकली व देवांना गंडरी नगरीत बंदीवासी केले. त्याच्या जाचाला कंटाळून देवांनी संकट विमोचनार्थ गणेशाची आराधना सुरू केली त्यावर गणेशाने प्रसन्न होऊन, ‘ लवकरच पार्वती मातेच्या पोटी जन्म घेऊन मी तुमची सुटका करेन.’ असा आशीर्वाद दिला. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाने बालकरूपात अवतार घेतला. काही दिवसांनी मोरावर आरूढ होऊन गणेशाने सिंधू राजाबरोबर युद्ध आरंभले. गणेशाने कमलासुराचा वध करून त्याच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकले. कमलासुराचे मस्तक ज्या ठीकाणी पडले तेच मोरगाव. थोडय़ाच कालावधीत गणेशाने सिंधूराजाचा वध करून देवास मुक्त केले. मोरावर बसून दैत्यांच्या पराभव केला म्हणून गणेश मोरेश्वर - मयुरेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले. तर येथील स्थानास मोरगाव म्हणून ओळखले जाऊ लागले.
मार्ग : मोरगांव – पुणे – सासवड – जेजुरी मार्गे मोरगावला जाता येते. स्वारगेट स्थानकावरून एस.टी.ची. सोय आहे. जेजुरीतूनच मोरगांवला जायला फाटा फुटतो. जेजुरी – मोरगांव अंतर १७ कि.मी., पुणे मोरगांव ६४ कि.मी, पुणे – सोलापूर रस्त्यावरील चौफुल्यापासूनही १३ किमी सुपा मार्गे ८ किमी मोरगांवला येण्यासाठी रस्ता आहे.
शिक्षण
बारामती शिक्षणाबाबत एक गाजलेलं शहर आहे. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, विद्यानगरी (विद्या प्रतिष्ठान), तसेच माळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालय व शारदाबाई पवार महिला ( कला, वाणिज्य, विज्ञान, गृहविज्ञान) महाविद्यालय सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. विविध जिल्ह्यातील तसेच परराज्यातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यावयास येतात. शिक्षणाच्या बाबतीत व्यवस्थापन, अभियांत्रिकी, आरोग्य, संगणक आणि माहिती व तंत्रज्ञान, कायदा, मनुष्यबळ विकास, कृषी, शास्त्र, वित्तसाहाय्य, एनिमेशन, कला, वाणिज्य, डिझायनिंग, पाकशास्त्र, ह्युमॅनिटीज, मुक्त शिक्षण अभ्यासक्रम यामध्ये महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुविधा सरकारी, खासगी, एनजीओ यांच्याद्वारे उपलब्ध आहेत. बारामती मध्ये फिलसॉफ्टस नावाची सॉफ्टवेर कंपनी देखील आहे. या वर्षी बारामती मध्ये शासकीय वैद्यकिय (मेडिकल) महविद्यालय सुरू झाले आहे.
बारामती तालुक्यातील गावे
१)शिर्सुफळ
शिर्सुफळ हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव बारामती शहरापासून २७.५ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. शिर्सुफळ या गावी जाण्यासाठी बस आणि रेल्वे यांची सोय आहे.शिर्सुफळ हे गाव १२ वाड्यांनी मिळून बनलेलं आहे. शिर्सुफळ हे गाव श्री शिरसाई देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शिरसाई देवीचे मंदिर प्राचीन काळी बांधलेले असून त्याचे पूर्ण काम हे दगडी आहे.मंदिरात दोन दीपमाळ आहेत. एकून चार छोटे कळस व एक मोठ शिखर आहे.या मंदिरात त्याच बरोबर पूर्ण शिर्सुफळ गावात खूप सारी माकडे आहेत.म्हणूनच शिर्सुफळ गावाला माकडांच गाव असेही म्हणतात.
शिर्सुफळ गावात शुक्रवार हा बाजार दिवस असतो. या गावात श्री शिरसाई विद्यालय शिर्सुफळ ही माध्यमिक शाळा आहे .तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद् शाळा शिर्सुफळ ही प्राथमिक शाळा आहे.त्याचबरोबर गावात महादेवाचे मंदिर आहे.गावात प्राथमिक आरोग्य केंद्र देखील आहे.
शिर्सुफळ या गावची यात्रा अक्षय तृतीयेच्या दुसरा दिवस पासून सुरुवात होते. चार दिवस श्री शिरसाई देवीची यात्रा असते.
२)कटफळ
कटफळ हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव बारामती शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.कटफळ या गावी जाण्यासाठी बस आणि रेल्वे यांची सोय आहे. कटफळ हे गाव श्री जानाई देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.कटफळ गावात रविवार हा बाजार दिवस असतो.
३)मोरगाव
मोरगाव हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव बारामती शहरापासून ३७.९ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.मोरगाव हे गाव मोरेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. अष्टविनायकामधिल हे एक मंदिर आहे.या गणपतीला मानाचा गणपती असेही म्हणतात.
४)सोमेश्वर
सोमेश्वर हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव बारामती शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे.सोमेश्वर हे गाव सोमेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.याचबरोबर या गावात सोमेश्वर सहकारि साखर कारखाना देखिल आहे.सोमेश्वर या गावात सोमेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालय ,सोमेश्वर सायन्स् कॉलेज देखिल आहे.त्याच बरोबर सोमेश्वर गावात मंगळवार हा बाजार दिवस असतो. सोमेश्वर येथे मु.सा.काकडे हे महाविद्यालय आहे.
५) माळेगांव बु.
माळेगांव हे बारामती तालुक्यातील एक गाव आहे . येथे माळेगांव सहकारी साखर कारखाना आहे व शारदाबाई पवार महिला महाविद्यालय आहे तसेच शेती विषयक शेतीचे व्यवस्थापन आणि समिती स्थापन आहे. व शिक्षण संस्था कार्यरत आहेत.
संदर्भ
[२] http://censusindia.gov.in/2011census/dchb/2725_PART_B_DCHB_PUNE.pdf
पुणे जिल्ह्यातील तालुके |
---|
हवेली तालुका | पुणे शहर तालुका | खेड तालुका | जुन्नर तालुका | आंबेगाव तालुका | मावळ तालुका | मुळशी तालुका | भोर तालुका | शिरूर तालुका | राजगड तालुका | पुरंदर तालुका | बारामती तालुका | इंदापूर तालुका | दौंड तालुका |
- ^ [भूगर्भातील जल संसाधने व स्वच्छता गृहांची उपलब्धता "भूगर्भातील जल संसाधने व स्वच्छता गृहांची उपलब्धता"] Check
|दुवा=
value (सहाय्य). http://censusindia.gov.in/2011census/dchb/2725_PART_B_DCHB_PUNE.pdf. External link in|संकेतस्थळ=
(सहाय्य) - ^ (PDF) http://censusindia.gov.in/2011census/dchb/2725_PART_B_DCHB_PUNE.pdf. Missing or empty
|title=
(सहाय्य)