Jump to content

बाराबती स्टेडियम

बाराबती स्टेडियम
मैदान माहिती
स्थानकटक, ओडिशा
स्थापना १९५८
आसनक्षमता ४५,०००
मालक ओडिशा क्रिकेट असोसिएशन
प्रचालक ओडिशा क्रिकेट असोसिएशन
यजमानओडिशा क्रिकेट संघ (१९५८-सद्य)
ओडिशा फुटबॉल संघ (१९५८-सद्य)
डेक्कन चार्जर्स (२०१०-२०१२)
किंग्स XI पंजाब (२०१४)
कोलकाता नाईट रायडर्स (२०१४)

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा.४-७ जानेवारी १९८७:
भारत  वि. श्रीलंका
अंतिम क.सा.८-१२ नोव्हेंबर १९९५:
भारत  वि. न्यूझीलंड
प्रथम ए.सा.२७ जानेवारी १९८२:
भारत वि. इंग्लंड
अंतिम ए.सा.१९ जानेवारी २०१७:
भारत वि. इंग्लंड
एकमेव २०-२०५ ऑक्टोबर २०१५:
भारत वि. दक्षिण आफ्रिका
शेवटचा बदल २० जानेवारी २०१७
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

बाराबती मैदान हे कटक, ओरिसा येथील एक खेळाचे मैदान आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हे नियमित ठिकाण आहे आणि ओडिशा क्रिकेट संघाचे हे होम ग्राऊंड आहे. सदर मैदान ओडिशा क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचे असून मैदानाच्या सर्व कारभाराची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. त्याशिवाय हे मैदान फुटबॉलसाठीही वापरले जाते. मैदानावर संतोष चषक ही राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आणि ओडिशा पहिली विभागीय लीग फुटबॉल स्पर्धा खेळवली जाते. [] भारतामधील सर्वात जुन्या क्रिकेट मैदानांपैकी एक असलेल्या बाराबती स्टेडियममध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाण्याआधी एमसीसी, वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियायी संघांचे सराव सामने झाले आहेत.

क्रिकेट आणि फुटबॉलच्या मैदानावर दिवस-रात्र सामन्यांसाठी प्रकाशझोतांची व्यवस्था आहे.

इतिहास

बाराबती मैदान कटक []येथे देशातील तिसरा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २७ जानेवारी १९८२ रोजी खेळवला गेला, ज्यामध्ये भारताने इंग्लंडला हरवून मालिकेत २-१ असे यश मिळवले. पाच मोसमांनंतर मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवला गेला, ज्यामध्ये अंदाज करता न येण्याइतकी उसळी मिळणाऱ्या, काम पुर्णपणे न झालेल्या खेळपट्टीने श्रीलंकेच्या संघाचे स्वागत केले. दिलीप वेंगसरकर, त्यावेळी आपल्या यशाच्या अत्त्युच्च शिखरावर होता, त्याने त्याची कसोटी क्रिकेटमधील १६६ धावांची सर्वोत्तम खेळी केली. सामन्यात दोन्ही संघांमधील इतर कुणालाही ६० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. श्रीलंकेचा दोनवेळा सर्वबाद करून भारताने १ डाव आणि ६७ धावांनी विजय मिळवला. कपिल देवने त्याचा ३००वा बळी ह्याच सामन्यात रुमेश रत्नायकेच्या रूपाने मिळवला.

१९९५-९६ मध्ये न्यू झीलंडविरुद्ध ह्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या एकमेव कसोटी सामन्यावर पावसाचा खूप वाईट परिणाम झाला. सामन्यात केवळ १७७.५ षटकांचा खेळ होऊ शकला. पुनरागमन करणाऱ्या नरेंद्र हिरवाणीने न्यू झीलंडचा एकमेव डावात ५९ धावांमध्ये ६ बळी घेऊन ह्या मैदानावरील सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली.

ह्या मैदानावर कसोटी सामने आता नियमित होत नसले तरीही त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे आणि येथे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने नियमित पणे होतात. दोन कसोटी सामन्यांतून भारताने एक कसोटी जिंकली आहे. तर, १७ एकदिवसीय सामन्यांपैकी ११ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मैदानावर रिलायन्स विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे आणि नेहरू चषक, १९८९ स्पर्धेतील इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान हे सामने खेळवले गेले आहेत. त्याशिवाय बाराबती स्टेडियममध्ये १९९६ विश्वचषक क्रिकेट स्पर्धांतील काही सामने खेळवले गेले होते.

२०१२ मध्ये, ओडिशा क्रिकेट असोसिएशनने बाराबती मैदानावरील इनडोअर हॉलला सचिन तेंडुलकरचे नाव दिले.

आकडेवारी आणि विक्रम

प्रकार कसोटी एकदिवसीय टी२०
सर्वात मोठी धावसंख्याभारतचा ध्वज भारत ४०० वि श्रीलंकाभारतचा ध्वज भारत ३८१/६ वि इंग्लंडदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९६/४ वि भारत
सर्वात लहान धावसंख्याश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १४२ वि भारतपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १४८/९ वि इंग्लंडभारतचा ध्वज भारत ९२ वि दक्षिण आफ्रिका
सर्वोत्कृष्ट फलंदाजीभारत दिलीप वेंगसरकर १६६ वि श्रीलंकाभारत मोहम्मद अझरुद्दीन १५३* वि झिम्बाब्वेदक्षिण आफ्रिका जेपी ड्युमिनी ३०* वि भारत
सर्वोत्कृष्ट गोलंदाजीभारत नरेंद्र हिरवाणी ६/५९ वि न्यूझीलंडवेस्ट इंडीज डॅरेन पॉवेल ४/२७ वि भारतदक्षिण आफ्रिका अल्बी मॉर्केल ३/१२ वि भारत
सर्वात मोठी भागीदारीभारत दिलीप वेंगसरकर व कपिल देव १११ वि श्रीलंकाभारत मोहम्मद अझरुद्दीन व अजय जडेजा २७५* वि झिम्बाब्वेभारत रोहित शर्माशिखर धवन २८ वि दक्षिण आफ्रिका
सर्वाधिक धावाभारत दिलीप वेंगसरकर १६६भारत सचिन तेंडूलकर ४६९दक्षिण आफ्रिका जेपी ड्युमिनी ३०
सर्वाधिक बळीभारत नरेंद्र हिरवाणी
भारत मनिंदरसिंग ६
भारत अनिल कुंबळे
भारत इशांत शर्मा
भारत अजित आगरकर
दक्षिण आफ्रिका अल्बी मॉर्केल
भारत रविचंद्रन अश्विन ३
  • श्रीलंकेविरुद्ध २ नोव्हेंबर २०१४ रोजी अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी २३१ धावांची सलामी दिली, जी आतापर्यंतची भारतातर्फे १ल्या गड्यासाठी तिसरी सर्वोत्तम भागीदारी आहे.[]

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

कसोटी

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
४-७ जानेवारी १९८७भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत१ डाव आणि ६७ धावाधावफलक
८-१२ नोव्हेंबर १९९५भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडअनिर्णितधावफलक

एकदिवसीय

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
२७ जानेवारी १९८२भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत५ गडीधावफलक
२७ डिसेंबर १९८४भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१ धावधावफलक
३० ऑक्टोबर १९८७ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया७० धावाधावफलक
१२ डिसेंबर १९८८भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारतचा ध्वज भारत५ गडीधावफलक
२२ ऑक्टोबर १९८९इंग्लंडचा ध्वज इंग्लंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानइंग्लंडचा ध्वज इंग्लंड४ गडीधावफलक
२८ डिसेंबर १९९०भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका३६ धावाधावफलक
९ नोव्हेंबर १९९४भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारतचा ध्वज भारत८ गडीधावफलक
१८ फेब्रुवारी १९९६भारतचा ध्वज भारतकेन्याचा ध्वज केन्याभारतचा ध्वज भारत७ गडीधावफलक
२७ ऑक्टोबर १९९६भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियारद्दधावफलक
९ एप्रिल १९९८भारतचा ध्वज भारतझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेभारतचा ध्वज भारत३२ धावाधावफलक
२ डिसेंबर २०००भारतचा ध्वज भारतझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेभारतचा ध्वज भारत३ गडीधावफलक
२२ जानेवारी २००२भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड१६ धावाधावफलक
६ नोव्हेंबर २००३भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड४ गडीधावफलक
२४ जानेवारी २००७भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारतचा ध्वज भारत२० धावाधावफलक
२६ नोव्हेंबर २००८भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत६ गडीधावफलक
२१ डिसेंबर २००९भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत७ गडीधावफलक
२९ नोव्हेंबर २०११भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारतचा ध्वज भारत१ गडीधावफलक
२६ ऑक्टोबर २०१३भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियारद्दधावफलक
२ नोव्हेंबर २०१४भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाभारतचा ध्वज भारत१६९ धावाधावफलक
१९ जानेवारी २०१७भारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत१५ धावाधावफलक

टी२०

आजवर मैदानावर झालेल्या टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांकसंघ १संघ २विजयी संघफरकधावफलक
५ ऑक्टोबर २०१५भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका६ गडीधावफलक

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ ओरिस्पोर्ट्स.कॉम वेळापत्रक
  2. ^ "बाराबती स्टेडियमविषयी तुम्हाला हे माहीत आहे काय? | Do you know about Barabati Stadium?". kheliyad (इंग्रजी भाषेत). 2021-03-10. 2021-03-28 रोजी पाहिले.
  3. ^ "नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / भागीदारीतील नोंदी / १ल्या गड्यासाठी सर्वोत्तम भागीदारी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "बाराबती स्टेडियम, कटक / नोंदी / एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). २६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "बाराबती स्टेडियम, कटक / नोंदी / एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). २६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "बाराबती स्टेडियम, कटक / नोंदी / टी२० सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). २६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.