Jump to content

बारडगड

बारडगड हा महाराष्ट्रातील पेशवेकालीन किल्ला आहे.

ऐतिहासिक महत्त्व

  • मराठे आणि पोर्तुगीज यांच्या युद्धादरम्यान देखरेखीसाठी पेशव्यांनी या किल्ल्याची निर्मिती केली असे मानले जाते. तारापूर हे बंदर येथून जवळ असल्याने किनारपट्टीवर लक्ष देण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असल्याचे अभ्यासक नोंदवतात.
  • या गडावर इराणमधून आलेल्या पारशी बांधवांनी अग्नी प्रज्वलित ठेवल्याची माहिती अभ्यासक आणि गिर्यारोहकांना उपलब्ध झाली आहे.
  • डहाणूजवळील एका डोंगरावर गडाचे बांधकाम करायचे असल्याचे संदर्भ ऐतिहासिक पुस्तकातून उपलब्ध झाले आहेत. हा डोंगर म्हणजे बारडगड होय असे अभ्यासकांनी मांडले आहे.[]

वेगळेपण

काळाच्या ओघात नामशेष झालेल्या या गडाचे अस्तित्व शोधण्याचा अभ्यासक आणि गिर्यारोहक यांनी प्रयत्न केला आहे.

- २० वर्षांपूर्वी हमिदा खान यांनी या गडाबद्दल माहिती प्रसिद्ध केली.
- २०१७ मध्ये चिंचणी हायकर्स या गिर्यारोहण संस्थेच्या सदस्यांनी या गडाचे अवशेष सापडल्याची माहिती दिली. []
- २०२० मध्ये सह्यस्पंदन या गिर्यारोहक संस्थेने या गडाचे अस्तित्व शोधणे आणि त्याचे ऐतिहासिक संदर्भ व नोंदी अभ्यासणे याचे काम केले.

स्वरूप

या गडावर सातवाहनकालीन भग्न अवशेष , खांब, तलाव आणि तटबंदी दिसून येतात.

संदर्भ

  1. ^ "विस्मृतीत गेलेल्या गडाचा गिर्यारोहकांकडून शोध". Loksatta. 2020-09-27. 2020-09-27 रोजी पाहिले.
  2. ^ "Ratnagiri | विस्मृतीत गेलेल्या गडाचा गिर्यारोहकांकडून शोध | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in". www.krushival.in (इंग्रजी भाषेत). 2020-09-27 रोजी पाहिले.[permanent dead link]