Jump to content

बामर लॉरी

बामर लॉरी
स्थापना कलकत्ता, ब्रिटिश अंमलाखालील भारत (1867; अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "०" अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "०" (1867))
मुख्यालयकोलकाता, भारत
मालक भारत सरकार
संकेतस्थळbalmerlawrie.com

बामर लॉरी अँड कंपनी लिमिटेड (बीएल) ही एक भागीदारी संस्था आहे. ही १ फेब्रुवारी १८६७ रोजी कोलकाता येथे जॉर्ज स्टीफन बाल्मर आणि अलेक्झांडर लॉरी या दोन स्कॉट्स लोकांनी स्थापन केली. आज बाल्मर लॉरी ही भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या अंतर्गत मिनी-रत्न I सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहे. याची उलाढाल ३१ मार्च २०१६ च्या आर्थिक वर्षात ₹२८९५ कोटी होती आणि ₹ २३४ कोटी नफा झाला होता. [][] इ.स. १९२४ मध्ये ही ४० लाख डॉलर्सची पेड अप भागभांडवलासहित खाजगी कंपनी बनली. इ.स. १९३६ मध्ये पब्लिक लिमिटेड कंपनी बनली. आणि त्यानंतर १९७२ मध्ये भारत सरकारच्या अधीन झाली. [][]

बीएल उत्पादनांमध्ये स्टील बॅरल्स, औद्योगिक वंगण, स्पेशॅलिटी स्नेहक, कॉर्पोरेट ट्रॅव्हल आणि लॉजिस्टिक सर्व्हिसेसचा समावेश आहे. कार्यप्रदर्शन रसायने आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ही कंपनी काम करते.

हे भारतातील स्टील बॅरेल्सचे सर्वात मोठे उत्पादक आहेत. [] या कंपनीचे मुख्यालय कोलकाता येथे आहे आणि त्याचे कार्यालये संपूर्ण भारतात आहे. तसेच यूकेमध्ये बेडफोर्ड येथेही आहेत.

संदर्भ

  1. ^ "Welcome to Balmer Lawrie Driven by Diversity Lead by Change". www.balmerlawrie.com (इंग्रजी भाषेत). 2017-01-31 रोजी पाहिले.
  2. ^ "Financial Results of Balmer Lawrie". www.balmerlawrie.com (इंग्रजी भाषेत). 2017-01-31 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Balmer Lawrie & Company Chairman Speech | Balmer Lawrie & Company Ltd Chairman Speech". economictimes.indiatimes.com. 2017-01-31 रोजी पाहिले.
  4. ^ "Milestones of Balmer Lawrie". balmerlawrie.com (इंग्रजी भाषेत). 25 November 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-31 रोजी पाहिले.

बाह्य दुवे