Jump to content

बाबूराव पेंढारकर

बाबूराव पेंढारकर
जन्मदामोदर गोपाळ पेंढारकर
२२ जून १८९६
कोल्हापूर
मृत्यू ०९ नोव्हेंबर १९६७
कोल्हापूर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख चित्रपट अयोध्येचा राजा
वडील डॉ.गोपाळ पेंढारकर
आई राधाबाई गोपाळ पेंढारकर
पत्नी कुमिदिनी पेंढारकर
अपत्ये त्यागराज,श्रीकांत ,श्रीलेखा, सुरेखा

बाबूराव पेंढारकर (अन्य लेखनभेद: बाबुराव पेंढारकर ;) (२२ जून, इ.स. १८९६ ; कोल्हापूर, महाराष्ट्र - ९ नोव्हेंबर, इ.स. १९६७) हे मराठी चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते होते. इ.स. १९२० साली त्यांनी सैरंध्री या मराठी चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९२० च्या दशकापासून इ.स. १९६० च्या दशकापर्यंतच्या सुमारे ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

मराठी चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे त्यांचे भाऊ होते.

बाबूरावांच्या जीवनावर "बाबूराव नावाचे झुंबर-बाबूराव पेंढारकर" हा श्रीकांत पेंढारकरांनी संपादित केलेला ग्रंथ मुंबईच्या मोरया प्रकाशनाने १९९० मध्ये प्रसिद्ध केला आहे.

बाह्य दुवे