Jump to content

बाबुलाल मरांडी

बाबुलाल मरांडी

लोकसभा सदस्य
कोडर्मा साठी
कार्यकाळ
२००४ – २०१४
पुढील रविंद्र कुमार राय

कार्यकाळ
१५ नोव्हेंबर २००० – १७ मार्च २००३
मागील पदनिर्मिती
पुढील अर्जुन मुंडा

जन्म ११ जानेवारी, १९५८ (1958-01-11) (वय: ६६)
गिरिडीह
राजकीय पक्ष झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक)
धर्म हिंदू

बाबुलाल मरांडी ( ३ मे १९५५) हे भारताच्या झारखंड राज्यामधील एक राजकारणी व माजी मुख्यमंत्री आहेत. स्वतंत्र झारखंड राज्याचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले मरांडी २००० ते २००३ दरम्यान ह्या पदावर होते. ते २००४ ते २०१४ दरम्यान लोकसभा सदस्य देखील होते.

कारकीर्द

राष्ट्रीय स्वयंसेवक संघविश्व हिंदू परिषद ह्या संस्थांसाठी कार्य केल्यानंतर मरांडी भारतीय जनता पक्षातर्फे सर्वप्रथम १९९१ साली लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिले परंतु त्यांना विजय मिळाला नाही. मरांडी ह्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १९९८ निवडणुकीत १४ पैकी १२ जागांवर विजय मिळवून जोरदार प्रदर्शन केले. मरांडी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये वन खात्याचे राज्यमंत्री होते. २००० साली बिहारचे विभाजन झाल्यानंतर झारखंडमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता मिळवली व मरांडी झारखंडचे पहिले मुख्यमंत्री बनले.

२००४ साली त्यांनी कोडर्मा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. परंतु २००६ मध्ये भाजपमधून वेगळे होऊन मरांडींनी झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) ह्या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी २००६ च्या पोटनिवडणुकीत तसेच २००९ लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजय मिळवून खासदारपद राखले. परंतु २०१४ लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांच्या पक्षाला एकाही जागेवर विजय मिळाला नाही.