Jump to content

बाबुराव गुरव

डॉ . बाबुराव गुरव हे मराठी साहित्यिक, प्राध्यापक, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. हे जानेवारी २०१३ मध्ये राहुरी येथे झालेल्या ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.[]

व्यक्तिगत जीवन

बाबुराव गुरवांचं मूळ गाव सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवठेएकंद आहे. निवृत्ती नंतर ते तासगावला स्थायिक झाले .

कारकीर्द

स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेत ३५ वर्षांहून अधिक काळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर पीएच . डी . केली. विद्रोही - सामाजिक चळवळींचा ते सक्रीय असत.

' एम . फुक्टो ' या प्राध्यापकांच्या संघटनेचे राष्ट्रीय स्तरावरील नेते होते, घरणग्रस्तांचं आंदोलन , दुष्काळी भागातील पाणीआंदोलन , धार्मिक व वांशिक दंगलविरोधी आंदोलनात सहभागी असत . 'अण्णाभाऊं साठे' , ' या जगात देव आहे का ?', ' भारतीय स्वातंत्र्य चळवळ - लोकविद्रोहाचा धगधगता अंगार ', ' फुले - शाहू - आंबेडकरवाद - समाजपरिवर्तनाची नवी दिशा ' इत्यादी विषयांवर पुस्तिका लिहिल्या.

राजर्षी शाहू , क्रांतिसिंह नाना पाटील , कर्मवीर भाऊराव पाटील , गाडगे महाराज , नागनाथअण्णा नायकवडी अशा अनेकांची चरित्रंही लिहिली . ' भैनाळ ', ' पाणी ', ' विवस्त्रा ' या त्यांच्या कादंबऱ्याही सामाजिक विषयांनाच वाचा फोडणाऱ्या होत्या . आपल्या साहित्यातून आणि विचारांतून हे सामाजिक भान सातत्याने राखले .

संदर्भ