Jump to content

बापूराव शिंगटे

'डॉ. बापूराव बब्रुवान शिंगटे'[]  हे रसायनशास्‍त्र विभाग[], डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे सहायक प्राध्यापक म्हणून २००८ पासून कार्यरत आहेत. त्यांचे जन्मगाव सलगरा दिवटी [ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद (महाराष्ट्र)] हे मागास भागातील असूनही त्‍यांनी डॉ.बा.आं.म.विद्यापीठाच्‍या रसायनशास्‍त्र विभागातून एम.एस्‍सी. पदवी विशेष प्राविण्‍यासह संपादन केली. त्‍यानंतर त्‍यांनी २००१ मध्ये सेट परीक्षेसोबतच यूजीसी-सीएसआयआर द्वारे घेतल्‍या जाणाऱ्या केमिकल सायन्सेसमध्ये नेट परीक्षा जेआरएफसह यश संपादन केले आहे. नेट परीक्षा जेआरफमध्‍ये उत्‍तीर्ण होणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील पहिले विद्यार्थी होत. यानंतर त्‍यांनी राष्‍ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), पुणे येथे डॉ.बी.जी. हाजरा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्टीरॉइड केमिस्ट्री’ या विषयावर संशोधन करून पुणे विद्यापीठातून पीएच. डी. पदवी संपादन केली (२०१०).

संशोधन व लेखन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्‍या रसायनशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाल्यानंतर, त्यांनी मूल्यवर्धित जैविक बदलांसाठी पर्यायी आणि अल्पखर्चिक संशोधन पद्धतींवर लक्ष केंद्रित केले. सध्‍या ते तर्कसंगत औषध डिझाईन पद्धतीचा उपयोग करून औषधीय रसायनशास्त्राच्या क्षेत्रात संशोधन योगदान देत आहेत. त्याच्या शोध गटामध्ये बायोडायनायमिक हेटोरोसायक्लॉचे लायब्ररी तयार केले आहे आणि त्यामुळे नवीन antitubercular आणि antifungal agents मिळविले आहेत. आतापर्यंत त्यांचे प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये ९६ शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून त्‍यांच्‍या ह्या शोधनिबंधाचा राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर १८१४ वेळा संदर्भ म्‍हणून उपयोग केला गेला. या संदर्भाचे प्रमाण प्रतिशोधनिबंध १८ इतके आहे, ज्याचा एच-इंडेक्स[] २३ आणि आय-10[] इंडेक्‍स ५८ आहे. विविध नामांकित नियतकालिकांमध्‍ये ते संपादक व सहसंपादक वा सदस्य संपादक म्‍हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्‍तापर्यंत दोन विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली असून ६ विद्यार्थी संशोधन करीत आहेत. डॉ.शिंगटे यांनी इंडो-यूएस रिसर्च फेलोशिप (२०१४) अंतर्गत प्रोफेसर लॅरी ओव्हरमन, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया[], आयर्विन, अमेरिका येथे निमंत्रित संशोधक (व्हिजिटिंग रिसर्चर) म्हणून काम केले आहे.  तसेच सीआरसी प्रेस टेलर ॲण्‍ड फ्रान्सिस []समूहाने प्रकाशित केलेल्या “Handbook on Applications of Ultrasound Sonochemistry for Sustainability” या पुस्तकात त्यांच्‍या Ultrasound in Synthetic Applications and Organic Chemistry  या प्रकरणाचा अंतर्भाव आहे. त्‍यांचे उल्‍लेखनीय कार्य म्‍हणजे अमेरिकन केमिकल सोसायटीच्‍या ‘Chemical Reviews[]’ या अत्‍यंत प्रतिष्ठित जर्नल्‍समध्‍ये त्‍यांचा रिव्हिव्यू लेख ४७·९२८ इम्‍पॅक्‍ट फॅक्‍टरसह प्रसिद्ध  झालेला आहे. याशिवाय ते विविध आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय सेमिनार व कॉन्फरन्स आणि विविध संस्था व विद्यापीठांमध्‍ये निमत्रित साधनव्‍यक्‍ती म्‍हणून स‍हभागी झालेले आहेत. तसेच विद्यापीठाच्‍या विद्यार्थी-केंद्रीत समित्‍यांवरही त्‍यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

मान-सन्‍मान

एक शिक्षक म्हणून, त्यांनी पदव्‍युत्तर विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या अध्‍ययन व संशोधनाकरिता सातत्‍याने उद्युक्‍त केले आहे. तसेच नेट, सेट आणि गेटसारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन आणि प्रेरित केले आहे. त्यांच्या वैज्ञानिक आणि शैक्षणिक योगदानाबद्दल त्‍यांना विविध पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आलेले आहे. यामध्‍ये प्रतिष्ठित शिक्षक प्रतिभा पुरस्कार-२०१२, आययूएसटीएएफ[] फेलो (२०१३), आदर्श शिक्षक पुरस्कार (२०१४) आणि सर्वोत्तम संशोधन प्रोफेसर पुरस्कार (२०१७) इत्‍यादींचा समावेश होतो. अलीकडेच त्‍यांच्‍या शैक्षणिक व संशोधनात्‍मक कार्याची दखल घेऊन इंडियन सोसायटी ऑफ केमिस्ट्स अँड बायोलॉजिस्ट्स (आयएससीबी[]), इंडिया यांनी डॉ.शिंगटे यांना ‘आयएससीबी-बेस्ट टीचर अवॉर्ड-२०१८ इन केमिकल सायन्सेस’ सन्‍मानित केले आहे.[]

संदर्भ

  1. ^ a b "संग्रहित प्रत". 2017-12-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-01 रोजी पाहिले.
  2. ^ http://www.bamu.ac.in/dept-of-chemistry/Faculty.aspx
  3. ^ https://en.wikipedia.org/wiki/H-index
  4. ^ http://guides.library.cornell.edu/c.php?g=32272&p=203393
  5. ^ https://www.universityofcalifornia.edu/
  6. ^ https://www.crcpress.com/
  7. ^ https://pubs.acs.org/journal/chreay
  8. ^ http://www.iusstf.org/
  9. ^ http://www.iscbindia.com/