बादशाही मशीद
बादशाही मशीद (उर्दू: بادشاہی مسجد) ही पाकिस्तान व दक्षिण आशियामधील दुसऱ्या क्रमांकाची तर जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी मशीद आहे. ही मशीद पंजाबच्या लाहोर शहरामध्ये स्थित असून ती इ.स. १६७३ साली सहावा मुघल सम्राट औरंगजेब ह्याने बांधली. सुमारे ५५,००० प्रार्थनाक्षमता असलेली बादशाही मशीद इ.स. १६७३ ते इ.स. १९८६ दरम्यान जगातील सर्वात मोठी मशीद होती. सध्या ती इस्लामाबादमधील फैसल मशीदीखालोखाल पाकिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी मशीद आहे.
बादशाही मशीदीची वास्तूरचना दिल्लीच्या जामा मशीदीसोबत मिळतीजुळती आहे. १९९३ सालापासून पाकिस्तान सरकारने बादशाही मशीदीला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानंच्या यादीमध्ये स्थान मिळावे ह्यासाठी प्रयत्न केले आहेत.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत