बाणाची कादंबरी
बाणाची कादंबरी हे मराठी लेखिका दुर्गा भागवत यांनी लिहिलेले पुस्तक आहे. संस्कृत कादंबरीकार बाणभट्ट यांच्या कादंबरीचा हा अनुवाद आहे.[१]
बाणभट्टाने संस्कृतमध्ये लिहिलेली 'कादंबरी' ही जगातली पहिली गद्य कादंबरी आहे.या कादंबरीत लांबलचक शब्दांच्या लांबीचा आणि संख्येचा उच्चांक आहे. नमुन्यादाखल हा शब्द पहा - हरिनखरभिन्नमत्तमातंगकुंभमुक्तरक्तार्द्रमुक्ताफलत्विंषि खंडितानि दाडिमबीजानि ।
बाणभट्टावरील मराठी पुस्तके
- कांदबरी सार (मराठी भाषांतर, भाषांतरकार - पां.गो. पारखी).
- बाणभट्ट (पांडुरंग गोविंद शास्त्री पारखी). हे पुस्तक डिजिटल स्वरूपात मसापच्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहे.
- बाणाची कादंबरी (अनुवादित, दुर्गा भागवत)
- बाणाची कादंबरी (मराठी अनुवाद, अनुवादक - विष्णूशास्त्री चिपळूणकर, सह-अनुवादक : कृष्णशास्त्री चिपळूणकर)