बाईपण भारी देवा
बाईपण भारी देवा | |
---|---|
दिग्दर्शन | केदार शिंदे |
निर्मिती | जिओ स्टुडियोझ आणि एमव्हीबी मीडिया |
प्रमुख कलाकार |
|
संकलन | मयूर हरदास |
छाया | वासुदेव राणे |
संगीत | साई-पियूष |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ३० जून २०२३ |
वितरक | पीव्हीआर पिक्चर्स |
निर्मिती खर्च | ₹५ कोटी[१] |
एकूण उत्पन्न | ₹९०.५० कोटी[२] |
बाईपण भारी देवा हा २०२३ मधील केदार शिंदे दिग्दर्शित भारतीय मराठी-भाषेतील नाटक चित्रपट आहे.[३] चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडियोझ आणि एमव्हीबी मीडियाद्वारे करण्यात आली असून यात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, दीपा परब, सुचित्रा बांदेकर आणि शिल्पा नवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[४]
शीर्षक गीत ‘बाईपण भारी देवा’च्या चित्रीकरणापर्यंत या चित्रपटाचे नाव ‘मंगळागौर ’ असे होते. सहनिर्माते अजित भुरे यांनी केदार शिंदेंना चित्रपटाचे शीर्षक बदलून बाईपण भारी देवा असे सुचवले. [५]
चित्रपटाने तिकीट खिडकीवर ५० दिवसांमध्ये ₹९०.५० कोटींहून अधिक कमाई केली.[६][७][८] हा आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला.[९] हा चित्रपट पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट[१०] आणि २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट म्हणून उदयास आला. याने मराठी चित्रपट उद्योगासाठी एका दिवसात ₹६.१० कोटींपेक्षा जास्त कमाईचा नवा विक्रम देखील रचला.[११] हा २०२३ मधील सर्वाधिक कमाई करणारा महिला केंद्रित चित्रपट आहे.[१२]
बाईपण भारी देवा हा समीक्षणात्मक तसेच व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट ठरला. चित्रपटाचे लेखन, कथा, संगीत आणि दिग्दर्शनासाठी प्रशंसा केली गेली आहे. बाईपण भारी देवा हा "ब्लॉकबस्टर" चित्रपट ठरला.[१२][१०]
प्रदर्शन तारीख
हा चित्रपट सर्व प्रथम २८ मे २०२१ ला प्रदर्शित होणार होता.[१३] त्यानंतर तो २८ जानेवारी २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आला.[१४] पुढे ६ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित तारीख ठरवण्यात आली.[१५] परंतु शेवटी ३० जून २०२३ ला चित्रपट प्रदर्शित झाला.[१६]
कथा
हा चित्रपट अशा सहा बहिणींची कथा आहे ज्या काही कारणास्तव एकमेकांपासून विभक्त होतात आणि कौटुंबिक, वैयक्तिक आणि आर्थिक समस्यांनाही तोंड देतात. [१७]
कलाकार
- रोहिणी हट्टंगडी
- वंदना गुप्ते
- दीपा परब
- सुकन्या कुलकर्णी
- सुचित्रा बांदेकर
- सुरुची अडारकर
- शिल्पा नवलकर
- सोहम बांदेकर
- साक्षी परांजपे
- वरद चव्हाण
- तुषार दळवी
- शरद पोंक्षे
- पीयूष रानडे
- स्वप्नील राजशेखर
निर्मिती
सुरुवात
जिओ स्टुडिओने आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२२ रोजी चित्रपटाची घोषणा केली. [१८] EmVeeBee मीडियाच्या माधुरी भोसले यांनी बेला शिंदे आणि अजित भुरे यांच्यासह चित्रपटाची निर्मिती केली आहे . [१९] [२०]
भूमिका
चित्रपटाची कथा सहा बहिणींवर महिला केंद्रीत असून अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, [२१] वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी, शिल्पा नवलकर [२२] प्रमुख भूमिकेत आहेत. [२३]
चित्रीकरण
भारतात कोरोना टाळेबंदीपूर्वी मुख्य छायाचित्रण सुरू करण्यात आले होते, परंतु महाराष्ट्रात कोविड-१९ साथीच्या आजारामुळे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. केदार शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, टाळेबंदीपूर्वी चित्रपटाचे ८० टक्के चित्रीकरण पूर्ण झाले होते. [२४] टाळेबंदीनंतर उत्तर-निर्मितीचे (पोस्ट-प्रॉडक्शन) काम पूर्ण झाले. [२५]
संगीत
चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत साई-पीयूष यांनी दिले आहे आणि संगीताचे पुनर्मुद्रण स्वरूप जोशी यांनी केले आहे. अदिती द्रविड आणि वलय मुलगुंद यांची अतिरिक्त गाणी व बोल आहेत, तर सावनी रवींद्र आणि मानसी हेडऊ यांनी गायन केले आहे.
प्रदर्शन
चित्रपटगृह
८ मार्च २०२३ रोजी, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर जाऊन चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. [२६] २८ एप्रिल २०२३ रोजी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला [२७] यानंतर ६ जून २०२३ रोजी मुंबईतील महालक्ष्मी मंदिराला भेट देणाऱ्या टीमसोबत शीर्षक गीत सादर करण्यात आले. [२८] चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर १३ जून २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपूर्ण टीम आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. [२९] हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
संदर्भ
- ^ "'बाईपण भारी देवा'ची जादू कायम, चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी खर्च केलेले फक्त 'इतके' रुपये". लोकसत्ता. 2023-07-19 रोजी पाहिले.
- ^ "Baipan Bhaari Deva Box Office Collection". एबीपी माझा. 2023-07-19 रोजी पाहिले.
- ^ "Baipan Bhari Deva: सर्वसामान्य आयुष्यातील सुपरवुमनची सुपर कथा, केदार शिंदेचा नवा चित्रपट". Hindustan Times Marathi. 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ "केदार शिंदेचा 'बाईपण भारी देवा..' या दिवशी होतोय प्रदर्शित." सकाळ. 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ "काय सांगता बाईपण भारी देवा हे सिनेमाचं नाव नव्हतंच... या व्यक्तीमुळं करण्यात आला नावात बदल". महाराष्ट्र टाइम्स. 2023-07-14 रोजी पाहिले.
- ^ "Marathi film 'Baipan Bhari Deva' unstoppable at box office, earns Rs 58 crore in 3 weeks". India Today (इंग्रजी भाषेत). 2023-07-24 रोजी पाहिले.
- ^ डेस्क, एबीपी माझा एंटरटेनमेंट (2023-08-14). "'सैराट'चा रेकॉर्ड मोडणार 'बाईपण भारी देवा'? कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क". marathi.abplive.com. 2023-08-17 रोजी पाहिले.
- ^ "Baipan Bhari Deva Box Office Collection | All Language | Day Wise | Worldwide - Sacnilk". www.sacnilk.com (इंग्रजी भाषेत). 2023-08-18. 2023-09-02 रोजी पाहिले.
- ^ "'बाईपण भारी देवा'ची बॉक्स ऑफिसवरील गाडी सुसाट, १०० कोटींचा आकडा करणार पार?". Lokmat. 2023-07-31. 2023-08-02 रोजी पाहिले.
- ^ a b "मराठी मूवी 'बाईपण भारी देवा' की ताबड़तोड़ कमाई, बॉक्स ऑफिस पर तोड़े रिकॉर्ड". आज तक (हिंदी भाषेत). 2023-07-07. 2023-07-19 रोजी पाहिले.
- ^ "Marathi Cinema : 5 करोड़ के बजट में बनी 'बिना हीरो वाली' फिल्म ने तोड़े कमाई के सभी रिकॉर्ड, सिनेमाघरों में उमड़ रही दर्शकों की भीड़". jagrantv (हिंदी भाषेत). 2023-07-19 रोजी पाहिले.
- ^ a b "Baipan Bhaari Deva Box Office: Kedar Shinde's Directorial Turns Out To Be The Latest Marathi Blockbuster, Makes Solid Returns Of 296%". Koimoi. 2023-07-09 रोजी पाहिले.
- ^ "Kedar Shinde releases poster of his new film 'Baipan Bhaari Deva'". Marathi Movie World (इंग्रजी भाषेत). 2023-07-20 रोजी पाहिले.
- ^ "Kedar Shinde's multi-starrer 'Baipan Bhaari Deva' to hit screens on January 28, 2022 - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2023-07-20 रोजी पाहिले.
- ^ "Kedar Shinde's multi-starrer 'Baipan Bhaari Deva' to hit screens on January 6, 2023 - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2023-07-20 रोजी पाहिले.
- ^ "केदार शिंदेचा 'बाईपण भारी देवा..' या दिवशी होतोय प्रदर्शित." सकाळ. 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ Marathi, TV9 (2022-08-19). "केदार शिंदेंचा 'बाईपण भारी देवा' या दिवशी होणार प्रदर्शित; चित्रपटात सर्वसामान्य आयुष्यातील सुपरवुमनची कथा". TV9 Marathi. 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ PTI (2022-09-06). "Jio Studios unveils slate of Marathi films, series". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ "The story of a super woman in a common life". Samna. 20 August 2022. 2023-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-07-15 रोजी पाहिले.
- ^ "केदार शिंदे यांचा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला.. 'बाईपण भारी देवा!'". Nagpur Today : Nagpur News (इंग्रजी भाषेत). 2022-03-09. 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ ""ती समोर आली की..." केदार शिंदेंची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाले "'बाईपण भारी देवा'च्या निमित्ताने..." | marathi director kedar shinde share special post for baipan bhari deva rohini hattangady nrp 97". Loksatta. 2023-07-01. 2023-07-02 रोजी पाहिले.
- ^ "Shilpa Navalkar movies, filmography, biography and songs - Cinestaan.com". Cinestaan. 2023-04-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-04-03 रोजी पाहिले.
- ^ ""या ६ बहिणींकडून…" भाऊबीजेच्या मुहूर्तावर केदार शिंदेच्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित". Loksatta. 26 October 2022. 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ "Baipan Bhari Deva: Kedar Shinde Presents A Woman Centric Marathi Entertainer | SpotboyE". www.spotboye.com (इंग्रजी भाषेत). 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ Poojari, Nitesh. "'Bai Pan Bhari Deva': Kedar Shinde resumes shooting of his upcoming film - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2023-01-03 रोजी पाहिले.
- ^ "Sachin Tendulkar announces release of Marathi film 'Baipan Bhari Deva'". Mid-day (इंग्रजी भाषेत). 2023-03-09. 2023-07-02 रोजी पाहिले.
- ^ "Video : "अर्ध आयुष्य संपलं, पण..." सहा बहिणींची अनोखी गोष्ट, केदार शिंदेंच्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित". Loksatta. 2023-04-28. 2023-07-02 रोजी पाहिले.
- ^ "'Baipan Bhari Deva': Makers seek blessings at Mahalaxmi temple as they unveil film's title song -Watch". The Times of India. 2023-06-06. ISSN 0971-8257. 2023-07-02 रोजी पाहिले.
- ^ "'बाईपण भारी देवा'चा ट्रेलर पाहून अशोक सराफ म्हणाले, 6 अभिनेत्रींना एकत्रित." News18 Lokmat. 2023-06-13. 2023-07-02 रोजी पाहिले.