Jump to content

बांधकाम अभियांत्रिकी

बांधकाम अभियांत्रिकी (Construction Engineering) ही शाखा महामार्ग, पूल, विमानतळ, रेल्वेमार्ग,धरणेइमारती आणि पाणीसाठे यांचे नियोजनव्यवस्थापन इत्यादींशी संबंधित आहे.अशा प्रकारच्या प्रकल्पांचे बांधकामासाठी अभियांत्रिकीव्यवस्थापनाचे ज्ञान असणे व व्यापाराच्या पद्धती अर्थशास्त्र व मानवी व्यवहार ज्ञात असणे जरुरी आहे.तात्पुरते बांधकाम, दर्जाची खात्री,[गुणवत्ता नियंत्रण, इमारत व प्रकल्पक्षेत्राच्या जागेचे सर्वेक्षण व आखणी, बांधकाम सामग्रीची चाचणी, कॉंक्रीट मिश्रणाचे आरेखन, मूल्य निर्धारण, नियोजन व आराखडा, सुरक्षा अभियांत्रिकी, सामग्री उपलब्ध करणे, अंदाजपत्रक आदी गोष्टींसाठी बांधकाम अभियंत्यांची गरज पडते.

कारकीर्द

बहुतेक सर्व प्रकारच्या व वेगवेगळ्या दर्जांचे शिक्षण घेतलेल्यांना बांधकाम उद्योग हा रोजगार पुरवितो. अमेरिकेच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात या उद्योगाचा वाटा १४% आहे. बांधकाम अभियांत्रिकी ही प्रकल्प कार्यालय व बांधकाम कार्यालय या दोघांनाही आरेखनाचे पाठबळ देते. एखाद्या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्यास, बांधकाम अभियंते हे वास्तुविशारद, तसेच इतर बांधकामकर्ते किंवा/व उच्च अभियंत्यांनी तयार केलेल्या आराखडे व मानकांवर अबलंबून असतात. २०व्या शतकात बहुतेक सर्व बांधकामे ही प्रथम आरेखित केली गेली आणि नंतर बांधली गेली. थोडे बांधकाम झाल्यावर अभियंत्यांचा चमू त्यावर चाचणी व मानकांनुसार देखरेख करून ते बांधकाम योग्य असल्याची खात्री करतो. २०व्या शतकाच्या आधी व २१व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत बांधकामांच्या उभारण्या ह्या स्थळाच्या स्थितीनुसार व बांधकामाच्या पद्धती याचे मिश्रण करून एकत्रितपणे केल्या जात होत्या.

कार्यक्षेत्र

बांधकाम अभियंत्यास काम करण्यास विपुल कार्यक्षेत्र आहे.या क्षेत्रात नव्याने उतरलेले अभियंते हे भूप्रदेशाच्या माहितीचे विश्लेषण करतात. बांधकाम अभियंत्यास संगणक सॉफ्टवेर वापरून, जलीय प्रणाली व उभारण्या यांचे नियमनानुसार आरेखन करावे लागते. बांधकामक्षेत्र सुरक्षित ठेवणे हे एखादी बांधकाम कंपनी प्रथितयश होण्याची किल्लीच आहे. सर्व बांधकामे योग्य पद्धतीने व बरोबर होतात की नाही हे बघणे बांधकाम अभियंत्यांचेच काम असते. सुरक्षेसोबतच त्यांना बांधकाम क्षेत्र हे स्वच्छ व अडथळ्याविना राहील याची काळजी घावी लागते. अनुभवी बांधकाम अभियंते प्रकल्पाचे योग्य तऱ्हेने नियोजन होते आहे अथवा नाही हे पण बघतात. प्रकल्पाचा खर्च वाढू नये व कामे अंदाजपत्रकाच्या मर्यादेतच रहावीत याकडे अभियंते लक्ष ठेवतात. बांधकामास आवश्यक असणारी माहिती पुरविणे, अश्य माहितीच्या विनंत्यांकडे लक्ष देणे, काही बदल झाल्यास त्याचे आदेश निर्गमित करणे व पुरवठ्याचे/कामगारांचे देयक देणे इत्यादी कामेही ते करतात.

बांधकाम अभियंत्यास गणित व विज्ञानाचे पुरेपूर व सखोल ज्ञान असणे अभिप्रेत असते. त्याव्यतिरिक्त, अनेक योग्यताही त्यांच्यात असाव्या लागतात. चिंतन, अडथळ्यांवर व समस्यांवर मात करणे, म्हणणे नीट ऐकून घेणे, शिकणे व अभ्यास, बारीक देखरेख तसेच निर्णयक्षमता हे देखील असावे लागणारे काही गुण आहेत. पुढे येणाऱ्या अडथळ्यांवर सर्वकष विचार करणे, इतर सहकाऱ्यांच्या त्याविषयीच्या कल्पना नीट ऐकणे, त्यांचा अभ्यास करून प्रकल्प सुरू होण्याआधी त्याबद्दलची संपूर्ण माहिती सहकाऱ्यांना देणे ही गरज असते. निर्माणादरम्यान गणितविज्ञानातील त्यांचे ज्ञान वापरून बांधकाम प्रकल्पांत समोर येणारे अडथळे/समस्या त्यांना सोडवाव्याच लागतात. बांधकाम अभियंत्यांनी प्रकल्पाच्या कामावरील श्रमिक व उपकरणे/यंत्रे यावर नियंत्रण ठेवणे जरुरीचे असते. ही प्रकल्प निर्धारित वेळेत कसा पूर्ण होईल व त्याची गुणवत्ता कशी राखली जाईल हे पण बघावयास लागते. .बांधकामादरम्यान काही म समस्या उभ्या राहिल्या तर त्यांची उकल अभियंत्यांनाच करावी लागते.

क्षमता

बांधकाम अभियंत्यांना त्यांचे काम करण्यास वेगवेगळ्या क्षमता हव्यात. तृटी आढळल्यास त्याबद्दल कारणे देणे, इतरांसमवेत सूचनांचे आदानप्रदान करणे, बदलती परिस्थिती जाणून घेणे, समस्या उद्भवण्यापूर्वीच तिचा अंदाज येणे, तोंडी, लेखी व आरेखित सूचना समजणे, आकडेवारीचे संच लावणे, स्पष्ट समजेल असे बोलणे, चतुर्थ परिमितीचे-काळ-क्षेत्र याचे आकलन करू शकणे व वास्तविक आरेखन व बांधकाम पद्धतीतील विविध प्रकारांचे ज्ञान असणे या आवश्यक क्षमता आहेत.

शैक्षणिक आवश्यकता

बांधकाम अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम हा अभियांत्रिकी आरेखन , बांधकाम व्यवस्थापन व अभियांत्रिकी यंत्रशास्त्र या शाखांसमवेतच, सामान्य विज्ञान व गणित या सर्वांची सरमिसळ असतो.स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी ही अभियांत्रिकी व्यवस्थापन, व्यापार प्रशासन या विषयांसह घेता येते.

रोजगाराच्या अपेक्षा

सन २००८पासून बांधकामांची संख्या कमी झाल्यामुळे मागणी रोडावली होती. परंतु अभियांत्रिकीच्या स्वयंचलित यंत्रांमुळे ती मागणी सध्या वाढत आहे.

पुस्तके

बांधकाम कसे करावे याची माहिती देणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :-

  • गृहरचना आणि बांधकाम (अरविंद विनायक झारापकर)
  • दिशा बांधकाम नवनिर्मितीची (स्थापत्य अभियंते प्रकाश मेढेकर)
  • सार्वजनिक बांधकाम विभाग संपूर्ण मार्गदर्शक (अभ्यासाचे पुस्तक; डॉ.सुरेश माने, सौ.संगीता माने)
  • सोप्पी ओळख बांधकाम शास्त्राची (महेश यशराज)

हे सुद्धा बघा

संदर्भ

  • The Book of Knowledge. (1992). Engineering. In The New Book of Knowledge (Vol. 5, pp. 224–225). Danbury, CT: Grolier Incorporated.