बांगलादेश रेल्वे
प्रकार | सरकारी उद्योग |
---|---|
उद्योग क्षेत्र | रेल्वे वाहतूक |
स्थापना | १५ नोव्हेंबर १८६२ |
मुख्यालय | ढाका, बांगलादेश |
सेवा | प्रवासी वाहतूक, माल वाहतूक, पार्सल सेवा |
महसूली उत्पन्न | ८० लाख टका (२०१४ साली) |
एकूण उत्पन्न (कर/व्याज वजावटीपूर्वी) | -८० लाख टका (२०१४ साली) |
मालक | बांगलादेश सरकार |
कर्मचारी | २७,५३५ |
पालक कंपनी | बांगलादेश रेल्वे मंत्रालय |
संकेतस्थळ | http://www.railway.gov.bd/ |
बांगलादेश रेल्वे ((बंगाली: বাংলাদেশ রেলওয়ে) ही बांगलादेश देशाची राष्ट्रीय रेल्वे कंपनी आहे. एकूण ३,६०० किमी लांबीचे लोहमार्गाचे जाळे असलेली बांगलादेश रेल्वे देशामध्ये प्रवासी व मालवाहतूक पुरवते. ब्रिटिश राजवटीदरम्यान १८६२ साली बंगाल आसाम रेल्वे ह्या नावाने स्थापन झालेली बांगलादेश रेल्वे आजच्या घडीला बांगलादेशातील सर्वाधिक वापरली जाणारी वाहतूक यंत्रणा आहे. बांगलादेश रेल्वे प्रामुख्याने ब्रॉड गेजवर धावते व राजधानी ढाकाला देशातील इतर प्रमुख शहरांसोबत जोडते. आजच्या घडीला सर्व रेल्वे वाहतूक डिझेल इंजिनांद्वारेच करण्यात येते.
प्रमुख मार्ग
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत