Jump to content

बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६-१७

बांगलादेश क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६-१७
श्रीलंका
बांगलादेश
तारीख७ मार्च – ८ एप्रिल २०१७
संघनायकरंगना हेराथ (कसोटी)
उपुल तरंगा (ए.दि.)
मुशफिकुर रहिम (कसोटी)
मशरफे मोर्तझा (ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाकुशल मेंडीस (२५४) तमिम इक्बाल (२०७)
सर्वाधिक बळीरंगना हेराथ (१७) मेहदी हसन (१०)
मालिकावीरशकिब अल हसन (बां)
एकदिवसीय मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाकुशल मेंडीस (१६०) तमिम इक्बाल (१३१)
सर्वाधिक बळीनुवान कुलशेखर (४)
सुरंगा लकमल (४)
तास्किन अहमद (६)
मशरफे मोर्तझा (६)
मुशफिकुर रहमान (६)
मालिकावीरकुशल मेंडीस (श्री)
२०-२० मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाकुशल परेरा (८१) सौम्य सरकार (६३)
सर्वाधिक बळीलसिथ मलिंगा (५) मुशफिकुर रहमान (४)
मालिकावीरलसिथ मलिंगा (श्री)

बांगलादेश क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०१७ दरम्यान श्रीलंका दौरा केला. दौऱ्यावर २-कसोटी, ३-एकदिवसीय आणि २-आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली.[][][] दौऱ्यावरील दुसरा कसोटी सामना हा बांगलादेशचा १००वा कसोटी सामना होता.[] दौऱ्यावर कसोटी मालिकेआधी दोन-दिवसीय आणि एकदिवसीय मालिकेआधी एक-दिवसीय सराव सामना खेळवण्यात आला.[] कसोटी मालिका, बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजिबुर रहमान ह्यांच्या सन्मानार्थ जॉय बांगला चषकासाठी खेळवण्यात आली.[]

मालिकेआधी, श्रीलंकेचा कर्णधार ॲंजेलो मॅथ्यूजला हॅमस्ट्रींगच्या दुखापतीमुळे वळण्यात आले.[] त्याच्या ऐवजी रंगना हेराथची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.[] एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी मॅथ्यूज तंदुरुस्त होऊ न शकल्याने उपुल तरंगाकडे दोन्ही मालिकांचे कर्णधारपद सोपविण्यात आले.[]

बांगलादेशने दुसऱ्या कसोटीमध्ये ४ गडी राखून विजय मिळविला आणि कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली,[१०]. हा बांगलादेशचा श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी विजय.[११] हा त्यांचा एकूण नववा आणि परदेशातील चवथा कसोटी विजय.[१२] तीन पैकी दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.[१३] टी२० मालिकासुद्धा १-१ अशी बरोबरीत सुटली.[१४]

तिसऱ्या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने एकदिवसीय मालिकेनंतर, बांगलादेशचा कर्णधार, मशरफे मोर्तझाला एका सामन्यासाठी निलंबित केले गेले.[१५] त्यामुळे मे २०१७ मधील, २०१७ आयर्लंड त्रिकोणी मालिकेच्या बांगलादेशच्या पहिल्या सामन्यात तो खेळू शकणार नाही.[१५] पहिल्या टी२० मालिकेच्या नाणेफेकी आधी, मशरफेने, मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.[१६]

संघ

कसोटी एकदिवसीय टी२०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका[१७]बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[१८]श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका[]बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[१९]श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका[२०]बांगलादेशचा ध्वज बांगलादेश[२१]
  • बांगलादेशी कर्णधार मुशफिकुर रहिमला केवळ फलंदाज म्हणून खेळण्यास सांगण्यात आले. लिटन दासची यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली.[२२] परंतू, दुसऱ्या कसोटीआधी सरावादरम्यान बरगड्यांना खालेल्या फ्रॅक्चरमुळे मुशफिकुर रहिमला शेवटच्या कसोटीमध्ये पुन्हा यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडावी लागली.[२३]
  • कुशल परेराला पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी श्रीलंकेच्या संघातून वगळण्यात आले, परंतु तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी तो तंदुरुस्त होण्याची आशा आहे.[२४]
  • मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका सुरू होण्याआधी मेहदी हसनला बांगलादेशच्या एकदिवसीय संघात निवडण्यात आले.[२५]
  • पहिल्या एकदिवसीय सामन्यात हात फ्रॅक्चर झाल्याने निरोशन डिक्वेल्लाला उर्वरित मालिकेतून वगळण्यात आले.[२६]
  • दिलरुवान परेरा, नुवान कुलशेखर आणि नुवान प्रदीपची श्रीलंकेच्या एकदिवसीय संघात निवड करण्यात आली.[२६]
  • नुवान परेराची श्रीलंकेच्या टी२० संघात निवड करण्यात आली, आणि त्याचबरोबर तंदुरुस्तीच्या कारणामुळे तो खेळू न शकल्यास त्याच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून संदुन वीराक्कोडीची निवड करण्यात आली.[२०]

सराव सामने

दोन दिवसीयः बांगलादेश वि. श्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI

२-३ मार्च २०१७
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
वि
श्रीलंका श्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI
३९१/७घो (९० षटके)
तमिम इक्बाल १३६ (१८२)
चामिका करुणारत्ने ३/६१ (१७ षटके)
४०३/७ (९० षटके)
दिनेश चंदिमल १९०* (२५३)
तास्किन अहमद ३/४१ (११ षटके)
सामना अनिर्णित
डि सॉयसा मैदान, मोराटुवा
पंच: रविंद्र कोट्टाहाचीची (श्री) आणि प्रदीप उडावट्टा (श्री)
  • नाणेफेक: श्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI, गोलंदाजी
  • प्रत्येकी १२ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)

एक दिवसीयः बांगलादेश वि. श्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI

२२ मार्च २०१७
धावफलक
श्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI श्रीलंका
३५४/७ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
३५२/८ (५० षटके)
संदुन वीराक्कोडी ६७ (५४)
सुंझामुल इस्लाम १/२७ (६ षटके)
शब्बीर रहमान ७२ (६३)
अकिला धनंजय ३/६१ (८ षटके)
श्रीलंका क्रिकेट अध्यक्षीय XI संघ २ धावांनी विजयी
कोलंबो
पंच: हेमंता बोटेजू (श्री) आणि लेंडन हन्नीबल (श्री)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी
  • प्रत्येकी १८ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)


कसोटी मालिका

१ली कसोटी

७-११ मार्च २०१७
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४९४ (१२९.१ षटके)
कुशल मेंडीस १९४ (२८५)
मेहेदी हसन ४/११३ (२२ षटके)
३१२ (९७.२ षटके)
मुशफिकुर रहीम ८५ (१६१)
दिलरुवान परेरा ३/५३ (१९ षटके)
२७४/६घो (षटके)
उपुल तरंगा ११५ (१७१)
मेहेदी हसन २/७७ (२० षटके)
१९७ (६०.२ षटके)
सौम्य सरकार ५३ (४९)
रंगना हेराथ ६/५९ (२०.२ षटके)
श्रीलंका २५९ धावांनी विजयी
गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली
पंच: अलीम दार (पा) आणि मराईस इरास्मुस (द)
सामनावीर: कुशल मेंडीस (श्री)
  • नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी
  • तिसऱ्या दिवसी ३ऱ्या सत्रतील खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला.
  • लिटन दासला (बां) बाद करून डॅनिएल व्हेट्टोरीचा (न्यू) डावखोऱ्या फिरकी गोलंदाजातर्फे सर्वात जास्त कसोटी बळी घेण्याचा ३६२ बळींचा विक्रम रंगना हेराथने (श्री) मोडला.[२७]
  • श्रीलंकेचा कर्णधार म्हणून पहिले तीन कसोटी सामने जिंकणारा रंगना हेराथ हा पहिलाच खेळाडू.[२७]


२री कसोटी

१५-१९ मार्च २०१७
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
३३८ (११३.३ षटके)
दिनेश चंदिमल १३८ (३००)
मेहेदी हसन ३/९० (२१ षटके)
४६७ (१३४.१ षटके)
शकिब अल हसन ११६ (१५९)
रंगना हेराथ ४/८२ (३४.१ षटके)
३१९ (११३.२ षटके)
दिमुथ करुणारत्ने १२६ (२४४)
शकिब अल हसन ४/७४ (३६.२ षटके)
१९१/६ (५७.५ षटके)
तमिम इक्बाल ८२ (१२५)
दिलरुवान परेरा ३/५९ (२२ षटके)
बांगलादेश ४ गडी राखून विजयी
पी सारा ओव्हल, कोलंबो
पंच: अलीम दार (पा) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: तमिम इक्बाल (बां)
  • नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी
  • कसोटी पदार्पण: मोसद्देक होसेन (बां).
  • हा बांगलादेशचा १००वा कसोटी सामना.[२८]
  • रंगना हेराथचे १,००० प्रथम श्रेणी बळी पूर्ण, असे करणारा तो श्रीलंकेचा दुसरा गोलंदाज.[२९]
  • बांगलादेशतर्फे कसोटीमध्ये १०० गडी बाद करणारा मुशफिकुर रहिम हा पहिलाच यष्टिरक्षक.[३०]
  • बांगलादेशचा हा श्रीलंकेवरील पहिलाच कसोटी विजय.[११]


एकदिवसीय मालिका

१ला सामना

२५ मार्च २०१७
१४:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
३२४/५ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२३४ (४५.१ षटके)
तमिम इक्बाल १२७ (१४२)
सुरंगा लकमल २/४५ (८ षटके)
दिनेश चंदिमल ५९ (७०)
मुस्तफिजुर रहमान ३/५६ (८.१ षटके)
बांगलादेश ९० धावांनी विजयी
महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान, हंबन्टोटा
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रणमोर मार्टिनेझ (श्री)
सामनावीर: तमिम इक्बाल (बां)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: मेहेदी हसन (बां)
  • सर्व प्रकारांमध्ये मिळून १०,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा तमिम इक्बाल हा बांगलादेशचा पहिला फलंदाज.[३१]
  • बांगलादेशची श्रीलंकेविरुद्धची ही सर्वात मोठी एकदिवसीय धावसंख्या आणि त्यांचा एकदिवसीय सामन्यामध्ये पहिली फलंदाजी करताना पहिलाच विजय.[३२]

२रा सामना

२८ मार्च २०१७
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३११ (४९.५ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
कुशल मेंडिस १०२ (१०७)
तास्किन अहमद ४/४७ (८.५ षटके)
अनिर्णित
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: रुचिरा पल्लियागुरूगे (श्री) आणि एस. रवी (भा)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
  • दोन डावांदरम्यान आलेल्या मुसळधार पावसामुळे सामना अर्धवट सोडून देण्यात आला.
  • उपुल तरंगाचा (श्री) २००वा एकदिवसीय सामना.[३३]
  • कुशल मेंडीसचे (श्री) पहिले एकदिवसीय शतक.[३३]
  • तास्किन अहमदची (बा) पहिली एकदिवसीय हॅट्ट्रीक.[३३]
  • रणगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदानावरील हा ५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[३४]

३रा सामना

१ एप्रिल २०१७
९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२८०/९ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२१० (४४.३ षटके)
कुशल मेंडिस ५४ (७६)
मशरफे मोर्तझा ३/६५ (१० षटके)
शकिब अल हसन ५४ (६२)
नुवान कुलशेखर ४/३७ (७.३ षटके)
श्रीलंका ७० धावांनी विजयी
सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: थिसारा परेरा (श्री)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी


टी२० मालिका

१ला टी२० सामना

५ एप्रिल २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५५/६ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१५८/४ (१८.५ षटके)
मोसद्देक होसेन ३४* (३०)
लसित मलिंगा २/३८ (४ षटके)
कुशल परेरा ७७ (५३)
मशरफे मोर्तझा २/३२ (४ षटके)
श्रीलंका ६ गडी व ७ चेंडू राखून विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: रणमोर मार्टिनेझ (श्री) आणि रवींद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: कुशल परेरा (श्री)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: मोहम्मद सैफुद्दीन (बां)


२रा टी२० सामना

६ एप्रिल २०१७
१९:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१७६/९ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३१ (१८ षटके)
शकिब अल हसन ३८ (३१)
लसित मलिंगा ३/३४ (४ षटके)
चामर कपुगेडेरा ५० (३५)
मुस्तफिजुर रहमान ४/२१ (३ षटके)
बांगलादेश ४५ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: रणमोर मार्टिनेझ (श्री) आणि रवींद्र विमलासिरी (श्री)
सामनावीर: शकिब अल हसन (बां)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: मेहदी सहन (बां)
  • *मशरफे मोर्तझाचा (बां) शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना.[३५]
  • लसित मलिंगाची (श्री) आंतरराष्ट्रीय टी२० हॅट्ट्रीक.[१४]


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "बांगलादेशचा श्रीलंका दौरा ७ मार्च पासून" (इंग्रजी भाषेत). १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "बांगलादेशच्या क्रिकेट मालिकांचे वेळापत्रक २०१७" (इंग्रजी भाषेत). 2017-02-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "बांगलादेशचा श्रीलंका दौरा फेब्रुवारीमध्ये". BDCricket24.Com (इंग्रजी भाषेत). 2017-02-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "बांगलादेश मार्च मध्ये १००वी कसोटी खेळणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  5. ^ "बांगलादेशचे श्रीलंका २०१७ वेळापत्रक जाहीर". श्रीलंका क्रिकेट (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  6. ^ "श्रीलंका-बांगलादेशच्या कसोटी मालिकेचे जॉय बांगला चषक असे नामकरण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  7. ^ "बांगलादेश कसोटीमधून मॅथ्यूज बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  8. ^ "बांगलादेश कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचे नेतृत्व हेराथकडे, पुष्पकुमारला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  9. ^ a b "कुशल परेरा, थिसाराचे श्रीलंकेच्या एकदिवसीय संघात पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "तमिमच्या ८२ धावांमुळे बांगलादेशचा १००व्या कसोटीमध्ये महत्त्वाचा विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ a b "सोळा वर्षे, १८ प्रयत्न, एक विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
  12. ^ "१००व्या कसोटीत बांगलादेशचा ४ गडी राखून विजय". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
  13. ^ "एकदिवसीय विजयांचा दुष्काळ संपवून श्रीलंकेची मालिकेत बरोबरी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  14. ^ a b "शकिब, मुस्तफुजूरमुळे बांगलादेशचा ४५-धावांनी विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  15. ^ a b "षटकांच्या कमी गतीमुळे मशरफेचे निलंबन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  16. ^ "श्रीलंका मालिकेनंतर मशरफे आंतरराष्ट्रीय टी२० मधून निवृत्त होणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १२ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  17. ^ "गुणरत्ने, डिक्वेल्लाचा कसोटी संघात समावेश". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  18. ^ "श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत मुस्तफिजूरचे पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  19. ^ "बांगलादेशच्या एकदिवसीय संघात सुंझामुल, शुवागताला पाचारण". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
  20. ^ a b "थिसारा, जयसुर्याची टी२० संघात निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  21. ^ "नवोदित मोहम्मद सैफुद्दीनची बांगलादेश टी२० संघात निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  22. ^ "मुस्तफिजूरला यष्टीरक्षण सोडण्यास सांगितले". इएसपीएन क्रिकइन्फो. ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  23. ^ "दुसर्‍या कसोटीमधून लिटन दास बाहेर, मुशफिकुर यष्टिरक्षणासाठी सज्ज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
  24. ^ "दुखापतग्रस्त कुशल परेराला पहिला दोन एकदिवसीय सामन्यांतून वगळण्यात आले". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  25. ^ "मेहदी हसनची बांगलादेशच्या एकदिवसीय संघात निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  26. ^ a b "हेयरलाईन फ्रॅक्चरमुळे डिक्वेल्ला मालिकेतून बाहेर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १९ एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  27. ^ a b "हेराथ: डावखोर्‍या फिरकी गोलंदाजातर्फे सर्वात जास्त बळी" (इंग्रजी भाषेत). १२ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  28. ^ "बांगलादेश कन्फ्रन्ट फॉर्म, सिलेक्शन कॉल्स फॉर लॅंडमार्क टेस्ट". इएसपीएन क्रिकइन्फो. २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
  29. ^ "हेराथचे १,००० प्रथम श्रेणी बळी पूर्ण". इएसपीएन क्रिकइन्फो. २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
  30. ^ "२४४: पी सारा ओव्हलवर बचाव केली गेलेली सर्वात लहान धावसंख्या". इएसपीएन क्रिकइन्फो. २० मार्च २०१७ रोजी पाहिले.
  31. ^ "तमिमच्या शतकामुळे बांगलादेशचा ९० धावांनी विजय" (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  32. ^ "तमिम्स हायज, ॲंड अ फर्स्ट फॉर बांगलादेश" (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  33. ^ a b c "मेंडिसच्या शतकानंतर श्रीलंकेच्या संधीदरम्यान पाऊस आडवा" (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  34. ^ "रणगिरी डंबुला मैदानावरील आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने" (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१७ रोजी पाहिले.
  35. ^ "मशरफेची निवृत्ती". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २० एप्रिल २०१७ रोजी पाहिले.

बाह्यदुवे