Jump to content

बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२

बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१–२२
न्यू झीलंड
बांगलादेश
तारीख१ – १३ जानेवारी २०२२
संघनायकटॉम लॅथममोमिनुल हक
कसोटी मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाटॉम लॅथम (२६७) लिटन दास (१९६)
सर्वाधिक बळीट्रेंट बोल्ट (९) एबादोत होसेन (९)
मालिकावीरडेव्हन कॉन्वे (न्यू झीलंड)

बांगलादेश क्रिकेट संघाने जानेवारी २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली. कसोटी सामन्यांआधी बांगलादेश संघाने एक सराव सामना खेळला. मूलत: वेळापत्रकात तीन ट्वेंटी२० सामन्यांचाही समावेश होता. परंतु नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यू झीलंड बोर्डाने ट्वेंटी२० सामने वगळून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले.

बांगलादेशने पहिला कसोटी सामना जिंकत इतिहास रचला. न्यू झीलंडविरुद्ध बांगलादेशने प्रथमच कसोटी विजय प्राप्त केला होता. परंतु हा विजयरथ बांगलादेशला चालु ठेवता आला नाही. दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करत न्यू झीलंडने मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेनंतर न्यू झीलंडचा खेळाडू रॉस टेलर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.

सराव सामने

दोन-दिवसीय सामना:न्यू झीलंड अ वि बांगलादेशी

२८-२९ डिसेंबर २०२१
धावफलक
न्यू झीलंड अ
वि
बांगलादेशी
१४६/७घो (४८ षटके)
जॅकब भुला ५७ (७५)
अबू जायेद ३/३६ (११ षटके)
२६९/८ (७६.४ षटके)
मुशफिकुर रहिम ६६ (९१)
ब्रेट रॅंडेल २/२७ (१३ षटके)
सामना अनिर्णित.
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि वेन नाइट्स (न्यू)
  • नाणेफेक: बांगलादेशी, क्षेत्ररक्षण.

१ली कसोटी

न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
३२८ (१०८.१ षटके)
डेव्हन कॉन्वे १२२ (२२७)
शोरिफुल इस्लाम ३/६९ (२६ षटके)
४५८ (१७६.२ षटके)
मोमिनुल हक ८८ (२४४)
ट्रेंट बोल्ट ४/८५ (३५.२ षटके)
१६९ (७३.४ षटके)
विल यंग ६९ (१७२)
एबादोत होसेन ६/४६ (२१ षटके)
४२/२ (१६.५ षटके)
नझमुल होसेन शांतो १७ (४१)
काईल जेमीसन १/१२ (३.५ षटके)
बांगलादेश ८ गडी राखून विजयी.
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि क्रिस गॅफने (न्यू)
सामनावीर: एबादोत होसेन (बांगलादेश)
  • नाणेफेक: बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
  • बांगलादेशचा कसोटीमध्ये न्यू झीलंडवरील हा पहिला वहिला विजय.
  • कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : बांगलादेश - १२, न्यू झीलंड - ०.


२री कसोटी

न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
५२१/६घो (१२८.५ षटके)
टॉम लॅथम २५२* (३७३)
शोरिफुल इस्लाम २/७९ (२८ षटके)
१२६ (४१.२ षटके)
यासिर अली ५५ (९५)
ट्रेंट बोल्ट ५/४३ (१३.२ षटके)
२७८ (७९.३ षटके)(फॉ/ऑ)
लिटन दास १०२ (११४)
काईल जेमीसन ४/८२ (१८ षटके)
न्यू झीलंड १ डाव आणि ११७ धावांनी विजयी.
हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि वेन नाइट्स (न्यू)
सामनावीर: टॉम लॅथम (न्यू झीलंड)