बांगलादेश क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२
बांगलादेश क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२ | |||||
दक्षिण आफ्रिका | बांगलादेश | ||||
तारीख | १८ मार्च – १२ एप्रिल २०२२ | ||||
संघनायक | डीन एल्गार (कसोटी) टेंबा बवुमा (ए.दि.) | मोमिनुल हक (कसोटी) तमिम इक्बाल (ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डीन एल्गार (२२७) | महमुदुल हसन जॉय (१४१) | |||
सर्वाधिक बळी | केशव महाराज (१६) | तैजुल इस्लाम (९) मेहेदी हसन (९) | |||
मालिकावीर | केशव महाराज (दक्षिण आफ्रिका) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रेसी व्हान देर दुस्सेन (९८) | तमिम इक्बाल (१२९) | |||
सर्वाधिक बळी | कागिसो रबाडा (६) | तास्किन अहमद (८) | |||
मालिकावीर | तास्किन अहमद (बांगलादेश) |
बांगलादेश क्रिकेट संघाने मार्च ते एप्रिल २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सामन्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले.
बांगलादेशने पहिला वनडे सामना ३८ धावांनी जिंकत इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेवर बांगलादेशने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकत मालिका १-१ अश्या बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली. मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात विजय मिळवत बांगलादेशने वनडे मालिका २-१ ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेत बांगलादेशने प्रथमच वनडे मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेने पहिला कसोटी सामना २२० धावांनी जिंकला. पहिल्या कसोटीत द्वितीय डावात बांगलादेशचा संघ केवळ ५३ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या कसोटीत देखील दक्षिण आफ्रिकेने वर्चस्व गाजवले. दक्षिण आफ्रिकेचे दोन खेळाडू सारेल अर्वी आणि वियान मल्डर यांना ऐन सामन्यात कोरोना झाल्याने त्यांच्याऐवजी दोन खेळाडूंनी त्यांना बदली केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्ये प्रथम:च कोव्हिड-१९ बदली खेळाडू वापरला गेला. दक्षिण आफ्रिकेने दुसरी कसोटी ३३२ धावांनी जिंकत दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० ने जिंकली.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
बांगलादेश ३१४/७ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २७६ (४८.५ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- विश्वचषक सुपर लीग गुण : बांगलादेश - १०, दक्षिण आफ्रिका - ०.
२रा सामना
बांगलादेश १९४/९ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १९५/३ (३७.२ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- विश्वचषक सुपर लीग गुण : दक्षिण आफ्रिका - १०, बांगलादेश - ०.
३रा सामना
दक्षिण आफ्रिका १५४ (३७ षटके) | वि | बांगलादेश १५६/१ (२६.३ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- विश्वचषक सुपर लीग गुण : बांगलादेश - १०, दक्षिण आफ्रिका - ०.
२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
१ली कसोटी
दक्षिण आफ्रिका | वि | बांगलादेश |
- नाणेफेक: बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
- ऱ्यान रिकलटन आणि लिझाद विल्यम्स (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : दक्षिण आफ्रिका - १२, बांगलादेश - ०.
२री कसोटी
दक्षिण आफ्रिका | वि | बांगलादेश |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- खाया झोंडो (द.आ.) याने वियान मल्डरला कोव्हिड-१९ बदली खेळाडू म्हणून संघात जागा घेत कसोटी पदार्पण केले. तसेच ग्लेंटन स्टूरमन यानेदेखील सारेल अर्वीच्या जागेवर कोव्हिड-१९ बदली खेळाडू म्हणून संघात जागा घेतली.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : दक्षिण आफ्रिका - १२, बांगलादेश - ०.