Jump to content

बांगलादेश क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१

बांगलादेश क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१
झिम्बाब्वे
बांगलादेश
तारीख७ – २७ जुलै २०२१
संघनायकब्रेंडन टेलर (कसोटी, ए.दि.)
सिकंदर रझा (ट्वेंटी२०)
मोमिनुल हक (कसोटी)
तमिम इक्बाल (ए.दि.)
महमुद्दुला (ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकालबांगलादेश संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाब्रेंडन टेलर (१७३) महमुद्दुला (१५०)
सर्वाधिक बळीब्लेसिंग मुझाराबानी (४) मेहेदी हसन (९)
एकदिवसीय मालिका
निकालबांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावारेजिस चकाब्वा (१६४) लिटन दास (१५५)
सर्वाधिक बळील्युक जाँग्वे (६) शाकिब अल हसन (९)
मालिकावीरशाकिब अल हसन (बांगलादेश)
२०-२० मालिका
निकालबांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावावेस्ली मढीवेरे (१५०) सौम्य सरकार (१२६)
सर्वाधिक बळील्युक जाँग्वे (५) शोरिफुल इस्लाम (६)
मालिकावीरसौम्य सरकार (बांगलादेश)

बांगलादेश क्रिकेट संघाने एकमेव कसोटी सामना, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२१ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला. बांगलादेशने २०१३ नंतर प्रथमच झिम्बाब्वेचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. नियोजनानुसार एकूण दोन कसोटी सामने खेळविले जाणार होते. परंतु ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेल्या २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी सराव व्हावा यासाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी संमतीने एक कसोटी सामना कमी केला आणि त्याजागी दोन ऐवजी तीन ट्वेंटी२० सामने जाहीर केले. सर्व सामने हरारे मधील हरारे स्पोर्ट्स क्लब या मैदानावर खेळवले गेले.

एकमेव कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू महमुद्दुला याने सदर कसोटी सामना संपताच कसोटी क्रिकेट मधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. बांगलादेशने एकमेव कसोटी सामना २२० धावांनी जिंकला. बांगलादेशने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकत एक सामना शेष असताना मालिकेत अभेद्य आघाडी मिळवली. तिसरा सामना देखील बांगलादेश ने जिंकत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली.

१९ जुलै २०२१ रोजी दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांच्या संमतीने ट्वेंटी२० मालिकेचे वेळापत्रक बदलण्यात आले. सुधारित वेळापत्रकानुसार तीन ट्वेंटी२० सामने अनुक्रमे २२, २३ आणि २५ जुलै २०२१ रोजी आयोजीत केले गेले. पहिला ट्वेंटी२० सामना बांगलादेशने जिंकला आणि अनोखा विक्रम रचला. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या संघांनंतर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील संघाचे १००वे सामने जिंकणारा बांगलादेश तिसरा देश ठरला. बांगलादेशने ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.

सराव सामने

दोन-दिवसीय सामना:झिम्बाब्वे निवड XI वि बांगलादेश

३-४ जुलै २०२१
धावफलक
बांगलादेश
वि
झिम्बाब्वे निवड XI
३१३/२घो (९० षटके)
शाकिब अल हसन ७४* (५६)
ल्युक जाँग्वे १/२३ (११ षटके)
२०२ (७४.५ षटके)
टिमेसेन मारूमा ५८ (१३२)
शाकिब अल हसन ३/३४ (१२.५ षटके)
२२/० (७.१ षटके)
तमिम इक्बाल १८* (३०)
सामना अनिर्णित.
ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
  • नाणेफेक: बांगलादेश, फलंदाजी.

५० षटकांचा सामना:झिम्बाब्वे निवड समिती XI वि बांगलादेश

१४ जुलै २०२१
०९:३०
धावफलक
बांगलादेश
२९६/६ (५० षटके)
वि
झिम्बाब्वे निवड समिती XI
१८९/७ (४०.१ षटके)
तमिम इक्बाल ६६ (६२)
वेस्ली मढीवेरे २/१२ (४ षटके)
टिमेसेन मारूमा ५९* (५९)
मोसद्देक हुसैन २/१६ (६.१ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि क्रिस्टोफर फिरी (झि)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
  • झिम्बाब्वे निवड समिती XI च्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.


कसोटी मालिका

एकमेव कसोटी

७-११ जुलै २०२१
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
४६८ (१२६ षटके)
महमुद्दुला १५०* (२७८)
ब्लेसिंग मुझाराबानी ४/९४ (२९ षटके)
२७६ (१११.५ षटके)
टाकुद्ज्वानाशी कैतानो ८७ (३११)
मेहेदी हसन ५/८२ (१३ षटके)
२८४/१घो (६७.४ षटके)
नझमुल होसेन शांतो ११७* (११८)
रिचर्ड नगारावा १/३६ (९ षटके)
२५६ (९४.४ षटके)
ब्रेंडन टेलर ९२ (७३)
मेहेदी हसन ४/६६ (३०.४ षटके)
बांगलादेश २२० धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: महमुद्दुला (बांगलादेश)


२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

विश्वचषक सुपर लीग
१६ जुलै २०२१
०९:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२७६/९ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१२१ (२८.५ षटके)
लिटन दास १०२ (११४)
ल्युक जाँग्वे ३/५१ (९ षटके)
रेजिस चकाब्वा ५४ (५१)
शाकिब अल हसन ५/३० (९.५ षटके)
बांगलादेश १५५ धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: लिटन दास (बांगलादेश)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
  • ताडीवनाशे मरुमानी आणि डीयोन मायर्स (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : बांगलादेश - १०, झिम्बाब्वे - ०.


२रा सामना

विश्वचषक सुपर लीग
१८ जुलै २०२१
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२४०/९ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२४२/७ (४९.१ षटके)
शाकिब अल हसन ९६* (१०९)
ल्युक जाँग्वे २/४६ (८ षटके)
बांगलादेश ३ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि मराइस इरास्मुस (द.आ.)
सामनावीर: शाकिब अल हसन (बांगलादेश)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : बांगलादेश - १०, झिम्बाब्वे - ०.


३रा सामना

विश्वचषक सुपर लीग
२० जुलै २०२१
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२९८ (४९.३ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
३०२/५ (४८ षटके)
तमिम इक्बाल ११२ (९७ षटके)
वेस्ली मढीवेरे २/४५ (१० षटके)
बांगलादेश ५ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि मराइस इरास्मुस (द.आ.)
सामनावीर: तमिम इक्बाल (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : बांगलादेश - १०, झिम्बाब्वे - ०.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२२ जुलै २०२१
१२:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१५२ (१९ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१५६/२ (१८.५ षटके)
बांगलादेश ८ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: क्रिस्टोफर फिरी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: सौम्य सरकार (बांगलादेश)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
  • बांगलादेशचा १००वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • डीयोन मायर्स (झि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

२३ जुलै २०२१
१२:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१६६/६ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४३ (१९.५ षटके)
झिम्बाब्वे २३ धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
सामनावीर: वेस्ली मढीवेरे (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
  • शमीम होसेन (बां) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


३रा सामना

२५ जुलै २०२१
१२:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१९३/५ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१९४/५ (१९.२ षटके)
बांगलादेश ५ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: सौम्य सरकार (बांगलादेश)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.