Jump to content

बहिरेश्वर


भारत देशातील प्रसिद्ध कोल्हापुर जिल्हयातील करवीर तालुक्याच्या पश्चिम दिशेला भोगावती व कुम्भी नदीच्या पवित्र संगमावरती बहिरेश्वर हे गांव वसलेले आहे. गांव तसे लहान आहे. गांवाचे ग्रामदैवत श्री कोटेश्वर असुन त्याचे मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. मंदिर अतिशय प्राचिन आहे. मन्दिरामध्ये भगवान शंकराच॓ अत्यंत शांत व प्रसन्न असे शिवलिग आहे. समोर डाव्या बाजुला पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीगोपालकृस्णाची रेखीव आणि मोहक, मनभावी मुर्ती असुन उजव्या बाजुला भैरवनाथाची दगडी मुर्ती आहे.[ चित्र हवे ] गावाच्या नैऋत्येला म्हसोबा देवाचे मंदिर आहे. हे मंदिर खुप विख्यात असुन फार लांबुन दर्शनासाठी भाविक येत असतात.