Jump to content

बहासा इंडोनेशिया

बहासा इंडोनेशिया (इंडोनेशियन भाषा) ही इंडोनेशियाची अधिकृत भाषा आहे. खरंतर ही मलाय भाषेची एक बोली आहे जिला इंडोनेशियन भाषा म्हणून १९४५ मध्ये स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात अधिकृतरीत्या स्वीकारले गेले. त्याआधीही १९२८ पासून "इंडोनेशियन युवक प्रतिष्ठान"नुसार त्यास अधिकृत भाषेचा दर्जा दिला होता.

इंडोनेशिया हा जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने ४था मोठा देश आहे. आणि या देशातील एकूण लोकसंख्येपैकी सहज बहासा बोलणारी जनता जवळ जवळ १००% आहे. त्यामुळे "बहासा इंडोनेशियन" ही जगातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक गणली जाते. बरीचशी इंडोनेशियन जनता बहासा इंडोनेशिया बरोबरच इतर स्थानिक बोलीभाषेतही पारंगत असते. मात्र सगळे दस्तऐवज, शिक्षण, पत्रकारिता आणि अधिकृत संभाषणाच्या इतर माध्यमात बहासा इंडोनेशिया हीच भाषा कटाक्षाने वापरण्यात येते. पूर्व तिमोर या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशातही बहासा इंडोनेशिया ही इंग्रजीबरोबरच दुसरी राष्ट्रभाषा आहे. बऱ्याच जुन्या इंग्लिश भाषा दस्तऐवजांमध्ये अजूनही ह्या भाषेचा उल्लेख केवळ "बहासा" असा केलेला आढळेल.