बहारे
?बहारे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | .४५६ चौ. किमी |
जवळचे शहर | डहाणू |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता | २,२९४ (२०११) • ५,०३१/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | वारली |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४०१६०२ • +०२५२८ • एमएच/४८ /०४ |
बहारे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे आंबेसरीनाका बसथांबा गेल्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २० किमी अंतरावर आहे.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४४२ कुटुंबे राहतात. एकूण २२९४ लोकसंख्येपैकी ११५२ पुरुष तर ११४२ महिला आहेत. गावाची साक्षरता ४०.५९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५२.७२ आहे तर स्त्री साक्षरता २८.७१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३९७ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १७.३१ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर,कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.ज्वेलरी डायमेकींग हा शतकापेक्षा जुना असलेला गृहउद्योग इथे पिढ्यानपिढ्या चालू आहे.हा भारत देशाबरोबरच दुबई, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका अशा अनेक देशातील सोने व्यापाऱ्यांचे मुख्य आकर्षण आहे. सोन्याच्या दागिन्यांवर आकर्षक आणि नाजूक नक्षीकाम करण्याचे कसब लाभलेले असे शेकडो डायमेकर्स आजुबाजूच्या परिसरात आहेत.
नागरी सुविधा
गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
मोठगाव, हाळापाडा,धुंदळवाडी, पारडी, ब्राह्मणवाडी, घाडणे, जिनगाव, गांगणगाव, बोडगाव, नागझरी, तालोठे ही जवळपासची गावे आहेत.बहारे ग्रामपंचायतीमध्ये बहारे, ब्राह्मणवाडी, आणि घाडणे ही गावे येतात.
संदर्भ
१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036