Jump to content

बहादूरवाडी

बहादूरवाडी
नावबहादूरवाडी
उंची
प्रकारस्थलदुर्ग
चढाईची श्रेणी
ठिकाणसांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाववाळवा,तांदुळवाडी
डोंगररांग
सध्याची अवस्थाव्यवस्थित
स्थापना{{{स्थापना}}}


बहादूरवाडी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बहादूरवाडी हा स्थलदुर्ग आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर तांदुळवाडी गावातून डाव्या बाजूस एक फाटा लागतो , तेथून ३ कि.मी. अंतरावर बहादूरवाडी गाव लागते. गावातच हा भुईकोट किल्ला आहे



या कोटाचे प्रवेशद्वार आजही सुस्थितीत आहे, भुईकोटाची तटबंदी अजून शाबूत आहे,आत प्रवेश केल्यानंतर बुरुज, अर्धवट भिंती असे काही अवशेष दिसून येतात. आकाराने हा भुईकोट तसा छोटासाच आहे. सध्या इथे काहीच वावर नसल्यामुळे झाडा-झुडपांची दाटी झालेली आहे.

संपूर्ण भुईकोट फिरण्यास अर्धा तास पुरेसा आहे.

संदर्भ

बाहय दुवे

किल्याच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे.