बहादूरगड
बहादूरगड / धर्मवीरगड | |
---|---|
धर्मवीरगड / पेडगाव चा किल्ला | |
अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत | |
बहादूरगड / धर्मवीरगड बहादूरगड / धर्मवीरगड | |
Coordinates | 18°30′28.63″N 74°42′14.88″E / 18.5079528°N 74.7041333°E |
प्रकार | भुईकोट किल्ला |
उंची | ५०३ मीटर (१,६५० फूट) |
जागेची माहिती | |
मालक | भारत सरकार |
द्वारे नियंत्रित |
|
सर्वसामान्यांसाठी खुले | होय |
परिस्थिती | अवशेष |
Site history | |
साहित्य | दगड |
बहादूर गड किंवा धर्मवीरगड तथा पेडगावचा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यात दौंड जवळ आहे.
स्थान
बहादूरगड पुण्यापासून सुमारे १०० किलोमीटर (६२ मैल) अंतरावर आहे. जवळचे शहर दौंड आहे. हा किल्ला भीमा नदीच्या उत्तरेकडील दौंड शहराच्या पूर्वेस सुमारे १५ किलोमीटर (९.३ मैल) अंतरावर पेडगाव या गावात आहे.
वर्णन
हा किल्ला आयताकृती आकाराचा आहे. या किल्ल्याला आठ प्रवेशद्वारे आहेत. गावाकडे जाण्याचा दरवाजा चांगल्या अवस्थेत आहे तर नदीच्या दिशेला असलेला दरवाजा मोडकळीस आलेला आहे.सध्या टीम धर्मवीरगडच्या माध्यमातून त्याचे संवर्धन सुरू आहे. किल्ल्याच्या आत ५ फूट (१.५ मी) उंचीचा हनुमानाचा पुतळा आहे. या किल्ल्यामध्ये यादव काळात निर्माण झालेल्या ६ मंदिरांचा गट आहे. हेमाडपंती मंदिरे बालेश्वर, लक्ष्मी-नारायण, मल्लिकार्जुन, रामेश्वर, पाताळेश्वर आणि भैरवनाथ यांची आहेत. भैरवनाथ मंदिरासमोर अनेक वीर दगड, सतीगल, तोफांचे गोळे, दीपमाळ आणि शिव मूर्ती आहेत. [१]
इतिहास
या किल्ल्याचा फार कमी इतिहास सर्वांना माहित आहे. मुघल साम्राज्याच्या काळात पेडगाव हे मुघल सैन्याचे मुख्य ठिकाण होते. १६७२ मध्ये दख्खनेतील मुघल सेनापती बहादूर खान (औरंगजेबाचा दुधभाऊ) आणि त्याचा मामा याने येथे तळ ठोकला आणि शिवाजी महाराजांच्या मराठा सैन्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. भीमा नदीतून पाणी आणण्यासाठी बहादूरखान याने जलवाहिनी बांधली. यावरील मोट आणि पर्शियन चाक आजही शाबूत आहेत. बहादूरखानाने या किल्ल्याचे नाव बहादूरगड असे ठेवले. यानंतर त्याच्या विरुद्ध स्वराज्यात पेडगावची मोहिम आखली गेली आणि त्या मोहिमेचे प्रमुख सरदार होते स्वतंत्र स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांच्या सोबत होते अनाजीपंत, मोरोपंत पिंगळे, येसाजी कंक, म्हाळोजी घोरपडे व त्यांचा मुलगा संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिर्जी नाईक व त्यांचा साथीदार नंदी इ. या पेडगाव मोहिमेचा खरा उद्देश होता तो त्या बहादूर खानाने लुटून आणलेले हिंदू देव-देवता त्याच्याकडून परत आणायचे त्यात होता मोरगावचा मयुरेश्वर, कुरकुंभ गावची ग्रामदेवी फिरंगाईदेवी, आणि अनेक मंदिरांचे कळस इ. या मोहिमेत सरसेनापतींनी ९,००० सेनेच्या दोन तुकड्या केल्या होत्या, त्यापैकी स्वतःसोबत त्यांनी २,००० सेना आणि बाकिची ७,००० सेना ही येसाजी कंक, म्हाळोजी घोरपडे आणि मोरोपंत पिंगळे यांना दिली होती, त्यांनी पेडगाव लुटायचा बेत आखला होता तो असा बहादूरगडच्या मुख्य दरवाजावर त्यांची ७,००० सेना उभी केली आणि त्यांना आदेश दिला कि बहादूरखानाची सेना आली तर उल्ट जंगलात पळायच म्हणजे इकडे त्यांना देव परत आणायला वेळ मिळेल आणि अशाप्रकारे हंबीररावांची सरसेनापती म्हणून पहिली मोहिम फत्ते झाली. आत औरंगजेबाचा दुमजली महाल आहे. १७५९ मध्ये पेडगाव हे सदाशिवराव भाऊ पेशवे यांनी ताब्यात घेतले आणि ते १८१८ पर्यंत मराठ्यांकडे राहिले. [२]
संदर्भ
- ^ "Bahadurgad, Western Ghats, Sahyadri, Adventure, Trekking". trekshitiz.com.
- ^ "Gazetteers Of The Bombay Presidency - Ahmadnagar". Gazetteers.maharashtra.gov.in. 2019-10-19 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- महान्यूज.कोम - पेडगावचा बहादुरगड Archived 2010-11-26 at the Wayback Machine.(मराठी)
- बहादुरगड (इंग्रजी)