बलराज साहनी
बलराज साहनी | |
---|---|
दमयंती व बलराज | |
जन्म | बलराज साहनी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
बलराज साहनी (मे १, १९१३ - एप्रिल १३, १९७३) हे बॉलीवूड अभिनेते आणि पंजाबी भाषेत लिहिणारे लेखक होते.[१]
जीवन
बलराज साहनी यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी असून त्यांचा जन्म पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा (आता पाकिस्तान) या गावी एका पंजाबी खत्री कुटुंबात झाला होता. लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर[२] त्यांनी काही काळ रावळपिंडी येथे कौटुंबिक व्यवसायात व्यतीत केला.
पुढे १९३० साली ते पत्नी दमयंतीसह रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले.[३] महात्मा गांधींसोबत काही काळ कामय केल्यानंतर ते १९३८ साली लंडन येथील बी.बी.सी.च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते.
'इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन' (आय.पी.टी.ए.) व 'पंजाबी कला केंद्राचे' ते संस्थापक सदस्य होते.[४]
बलराज साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात ‘बलराज साहनी-सहिर लुधियानवी फाउंडेशन स्थापन झाले आहे. या फाउंडेशनतर्फे दर वर्षी एका अभिनेत्याला ‘बलराज साहनी पुरस्कार दिला जातो. २०१७ साली हा पुरस्कार विक्रम गोखले यांना मिळाला.
अभिनय
प्रकाशित साहित्य
- पंजाबी नियतकालिक 'प्रीतलारी' मधून नियमित लेखन
- मेरा पाकिस्तानी सफर
- मेरी फिल्मी अमरकथा (आत्मचरित्र)
- मेरा रूसी सफरनामा
पटकथा
- बाजी (१९५१)
पुरस्कार
- पद्मश्री पुरस्कार, १९६९
- सोव्हिएट लॅंड नेहरू पुरस्कार
संदर्भ
- ^ एनसायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ पंजाबी लिटरेचर. लेखकः आर.पी. मल्होत्रा, कुलदीप अरोरा. प्रकाशकः ग्लोबल व्हिजन पब्लिशिंग हाऊस, २००३. ISBN 81-87746-51-3. पृ. ४३४
- ^ http://www.tribuneindia.com/2001/20010902/spectrum/main2.htm
- ^ "संग्रहित प्रत". 2012-07-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-01-27 रोजी पाहिले.
- ^ http://cities.expressindia.com/fullstory.php?newsid=69006