Jump to content

बर्लिन कराराचे परिणाम

बर्लिन कराराने तुर्की प्रदेशातील रशियाचे वर्चस्व रोखून धरले. परंतु या करारामुळे ' पूर्वेकडील प्रश्न ' सुटण्यास फारसी मदत झाली नाही. इंग्लंड , ऑस्ट्रिया व जर्मनी यांना जरी बर्लिन कराराने समाधान वाटले तरी इतर संबंधित राष्ट्रांना कोणताही दिलासा मिळू शकला नाही. सॅनस्टीफॅनोचा तह फिरवल्यामुळे रशिया संतप्त झाला. बोस्निया व हर्जेगोविना हे प्रदेश ऑस्ट्रियाला मिळाल्यामुळे रशियाचा तिळपापड झाला. ऑस्ट्रिया आणि रशिया यांच्यामध्ये बाल्कन प्रश्नावरून वैमनस्य वाढले. रशियाला तुर्की साम्राज्यात विस्तार करण्यास प्रतिबंध जरी झाला तरी आशियाचा इतर भाग त्याला आक्रमणासाठी मोकळा होता. इंग्लंडने १९०७ मध्ये रशियाशी मैत्रीचा करार केल्यानंतर बाल्कन प्रदेशामध्ये हस्तक्षेप करण्याचे धोरण रशियाने पुनः स्वीकारले.