बर्म्युडा त्रिकोण
बर्मुडा त्रिकोण हा साधारण बर्मुडा, पोर्तोरिको, आणि फोर्ट लॉडरडेल यांना जोडुन बनलेला अटलांटिक महासागरातील त्रिकोणी आकाराचा समुद्री प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ ३९,००,००० चौ. कि.मी. आहे.
या त्रिकोणाविषयी अनेक समज आहेत. उदा.
- अनेक जहाजे आणि विमाने आकस्मितरित्या बुडाली आहेत.
- भौतिक शास्त्राच्या नियमाविरुद्ध घटना.
- अनेक दुर्घटनांना अवकाशातील घटक कारणीभूत असल्याचाही समज आहे.
अमेरिकेच्या समुद्रकिनारपट्टी रक्षक दल आणि इतर संस्थांनी प्रचलीत समज चुकीचे आहेत असे सांगून बर्मुडा त्रिकोण मधील अपघात हे जगातील इतर अतिप्रवासाच्या भागापेक्षा जास्त नाहीत हे दर्शवणारी आकडेवारी दिली आहे. काही अपघातांची कारणे शोधण्यास यश मिळाले असले तरी, बऱ्याच अपघातांची कारणे अद्याप समजलेली नाहीत.