Jump to content

बर्नार्ड कॅझनूव

बर्नार्ड कॅझनूव (२ जून, इ.स. १९६३ - ) हे फ्रांसचे पंतप्रधान आहेत. हे ६ डिसेंबर, इ.स. २०१६ रोजी सत्तेवर. फ्रांसचे याआधीचे पंतप्रधान मॅन्युअल वॉल्स यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी अंतर्गत सुरक्षा मंत्री असलेले बर्नार्ड कॅझनूव यांची नियुक्ती झाली. मे २०१७मध्ये निवडणुका होईपर्यंत ते पंतप्रधानपदावर राहतील.

बर्नार्ड कॅझनूव हे व्यवसायाने वकील आहेत. इ.स. १९९७ पासून ते खासदार असून त्यापूर्वी ते शेरबोर्ग-ऑक्टेव्हिलचे महापौर होते.

यांची डिसेंबर २०१६पर्यंतची राजकीय कारकीर्द

  • सुरुवातीला चेरबर्ग शहराचे महापौर
  • १९९७मध्ये खासदार
  • ऐरॉ यांच्या मंत्रिमंडळात युरोपीय देशांतील प्रकरणे हाताळणाऱ्या खात्याचे मंत्रिपद (सन २०१२)
  • अर्थखात्याचे राज्यमंत्रिपद (मार्च २०१३)
  • मॅन्युअल वॉल्स यांच्या मंत्रिमंडळात अंतर्गत सुरक्षा मंत्री-गृहमंत्री
  • पंतप्रधान