बर्गर
बर्गर हा अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील अत्यंत लोकप्रिय खाद्य पदार्थ आहे.याचे चीज बर्गर,हॅम्बर्गर, व्हेज बर्गर, चिकन बर्गर असे विविध लोकप्रिय प्रकार आहेत.[१]
तयार करण्याची पद्धती
दोन गोलाकृती फुगीर पावांच्या (बर्गर बन्स) मध्ये लोणी,एखाद्या भाजीचे किंवा मांसाहारी कटलेट/टिक्की ,वाटाणा,पालक,चीझ तसेच काही पाने[लेट्यूस], कांदा टोमॅटो च्या चकत्या, मेयोनिज,बटर व त्यावर टोमॅटो, चिली,सोया किंवा कोणताही ऐच्छिक सॉस असे साधारणपणे स्वरूप याचे असते.सामान्यत: हा पदार्थ कोक, चिप्स इ.बरोबर खाल्ला जातो. [२] मॅकडोनाल्ड या कंपनीने हा खाद्य प्रकार जगभर लोकप्रिय केला आहे.
संदर्भ
- ^ Ray, Rachael (2012-06-05). The Book of Burger (इंग्रजी भाषेत). Simon and Schuster. ISBN 978-1-4516-5969-6.
- ^ Crocker, Betty (2014-08-13). 20 Best Burger Recipes (इंग्रजी भाषेत). Houghton Mifflin Harcourt. ISBN 978-0-544-50281-9.