Jump to content

बरगूर गाय

बरगूर गाय
बरगूर बैल

बरगूर किंवा बरगुरू (इंग्रजी:Bargur /तामिळ: பர்கூர் / कन्नड: ಬರಗೂರು/मल्याळम:ബർഗൂർ പശു) हा शुद्ध भारतीय गोवंश आहे. हा मुख्यतः पश्चिम तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील अंथियुर तालुक्यातील बरगूर पहाडी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळतो. नीट निगा राखल्यास बरगूर गाय दिवसाला तीन लिटरपर्यंत दूध देऊ शकते. ग्रामीण भागात या गायीचे दूध आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

शारीरिक रचना

मध्यम बांधा आणि काटक शरीर ही या जातीची विशेषता आहे. तांबड्या/तपकिरी रंगाच्या शरीरावर पांढरे ठसे असा यांचा वर्ण असून कधीकधी पांढऱ्या रंगावर तपकिरी ठसे पण आढळून येतात. शिंगे मुळाशी जवळ, सरळ, पाठीमागे वळलेली टोकदार आणि मध्यम आकाराची असतात. पाय काटक असतात.[] हा गोवंश थोडा तापट असल्याने यांना काळजीपूर्वक हाताळावे लागते. एकदा रुळले की मग हे बैल शेती कामासाठी आणि अवजड कामासाठी अतिशय उपयुक्त ठरतात.[]

वैशिष्ट्य

बरगूर बैलांचा मुख्य उपयोग शेती आणि अवजड कामासाठी केला जातो.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Indian Cow Breed Baragur" (इंग्रजी भाषेत). 2015-07-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत). 2020-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.