बरगड्या
बरगड्या ह्या कणाधाऱ्यांच्या शरीरशास्त्रानुसार, लांब वळलेली हाडे असतात, जी छातीचा एक प्रकारचा पिंजरा म्हणून काम करतात. बहुदा सर्व चतुष्पादी प्राण्यांत, बरगड्या या छातीभोवती असतात. त्यामुळे हृदयाचे आकुंचन व प्रसरण योग्य रितीने होते. त्यांचेमुळे हृदयास व तत्संबंधी इतर अवयवांना एक प्रकारे संरक्षण मिळते. सापासारख्या प्राण्यांत, बरगड्या या त्याच्या पूर्ण शरीराचे संरक्षण करतात व त्या त्याचे शरीरभर असतात.
बरगड्यांमुळे, त्या ठिकाणी झालेला कोणताही आघात, थेट हृदयासारख्या महत्त्वाच्या अवयवापर्यंत पोहोचू शकत नाही, अथवा त्याची तीव्रता कमी होते.