बरखा दत्त
बरखा दत्त या एक भारतीय दूरचित्रवाणी पत्रकार आणि लेखिका आहेत. त्या मोजो स्टोरी या यूट्यूब न्यूझ चॅनेलच्या मालकीणही आहेत.[१][२]
त्या द हिंदुस्तान टाईम्स आणि द वॉशिंग्टन पोस्टच्या एक स्तंभलेखिका आहेत. दत्त या २१ वर्षे एनडीटीव्हीच्या पत्रकार होत्या.[३] जानेवारी २०१७ मध्ये त्यांनी चॅनल सोडले.[४] १९९९ च्या भारत-पाकिस्तान कारगिल युद्धातील पत्रकारितेनंतर त्या एक प्रमुख पत्रकार म्हणून उदयास आल्या.[५] एनडीटीव्हीवर दत्त साप्ताहिक पुरस्कार-विजेता कार्यक्रम "वी द पीपल", तसेच दैनिक प्राइम-टाइम शो 'द बक स्टॉप्स हिअर"च्या सूत्रसंचालिका होत्या.[६][७][८]
बरखा दत्त यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. यामध्ये पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मानचाही समावेश होतो.[९]
जीवन
त्यांचा जन्म नवी दिल्ली येथे एर इंडियाचे अधिकारी एस.पी. दत्त आणि प्रभा दत्त यांच्या पोटी झाला, ज्या हिंदुस्तान टाइम्सच्या प्रसिद्ध पत्रकार होत्या. दत्त यांनीत्यांच्या पत्रकारितेच्या कौशल्याचे श्रेय आईला दिले, ज्या भारतातील महिला पत्रकारांपैकी एक अग्रणी होत्या. त्यांची धाकटी बहीण बहार दत्त ही देखील CNN IBN साठी काम करणारी दूरदर्शन पत्रकार आहे. त्या स्वतःला अज्ञेयवादी म्हणून वर्णन करते जो धर्म नाकारतो.[१०]
कारकीर्द
दत्त यांनी सेंट स्टीफन कॉलेज, दिल्ली येथून इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली. तसेच जामिया मिलिया इस्लामिया मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर, नवी दिल्ली येथून मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स केले. त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीची सुरुवात एनडीटीव्ही मधून केली आणि नंतर संस्थेच्या इंग्रजी वृत्त शाखेच्या प्रमुखपदी त्यांनी काम केले. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ जर्नलिझम, न्यू यॉर्कमधून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी देखील मिळवली.
कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या मुलाखतीसह १९९९ मधील कारगिल संघर्षाच्या अहवालामुळे त्यांना भारतात प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी काश्मीर, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराकमधील संघर्ष कव्हर केले आहेत.[११]
संदर्भ
- ^ "Journalism ethics row grips India" (इंग्रजी भाषेत). 2010-12-03.
- ^ Dwivedi, Rama (2022-02-02). "Barkha Dutt Slams Mentor Company NDTV Over Use Of MoJo". https://www.outlookindia.com/ (इंग्रजी भाषेत). 2022-03-04 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ "बरखा दत्त एनडीटीव्ही सोडणार!". Maharashtra Times. 2022-03-04 रोजी पाहिले.
- ^ "NDTV Statement On Barkha Dutt". NDTV.com. 2022-03-04 रोजी पाहिले.
- ^ "Business News Today: Read Latest Business news, India Business News Live, Share Market & Economy News". The Economic Times (इंग्रजी भाषेत). 2022-03-04 रोजी पाहिले.
- ^ "Kumaon Literary Festival". kumaonliteraryfestival.org (इंग्रजी भाषेत). 2022-03-04 रोजी पाहिले.
- ^ "बरखा दत्त यांचा एनडीटीव्हीतून राजीनामा!". Loksatta. 2022-03-04 रोजी पाहिले.
- ^ "7 journalists who changed the face of Indian journalism". www.indiaeducation.net. 2022-03-04 रोजी पाहिले.
- ^ "Smash Brahminical Patriarchy outrage: Barkha Dutt counters Twitter executive, says it wasn't a 'private photo'". www.dnaindia.com. 2022-03-04 रोजी पाहिले.
- ^ "As Indian as they come". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2006-03-14. 2022-03-04 रोजी पाहिले.
- ^ "Business News Today: Read Latest Business news, India Business News Live, Share Market & Economy News". The Economic Times (इंग्रजी भाषेत). 2022-03-04 रोजी पाहिले.