Jump to content

बमंकडा धबधबा

बमान्कडा हा धबधबा रत्‍नागिरी शहरातील संगमेश्वर तालुक्यातील माखजन ह्या ठिकाणापासून ६-७ किलोमीटर अंतरावर धामापूर गावातील धनावडे वाडीजवळ स्थित आहे. हा धबधबा ज्या ठिकाणी स्थित आहे, ती वाट शोधणे आणि तिथपर्यंत पोहोचणे खूप अवघड आहेच पण ह्याचा अनुभव अतिशय मनोरंजक आहे. रत्‍नागिरी शहरापासून धामापुर गावापर्यंत १:३० तासावर आहे आणि त्या पुढे १ किलोमीटर चढाई आहे. पूर्वार्ध वाटेत काही अडचण नसून ती लवकर पार होऊ शकते. पण जसं आपण धबधब्याजवळ जातो तसतशी ती वाट खूपकिचकट होत जाते.