बबन पोतदार
बबन पोतदार हे एक मराठी ग्रामीण कथालेखक आहेत. त्यांच्या गुंजेचा पाला, आक्रित आणि एका सत्याचा प्रवास हे कथासंग्रह प्रकाशित झाले असून प्रत्येक संग्रहाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील अशा रंगल्या गप्पागोष्टी, ट्रॅप आदि मालिकांचे तसेच आकाशवाणीवरील अनेक कौटुंबिक श्रुतिकांचे लेखनही त्यांनी केले आहे. त्यांच्या आक्रीत कथासंग्रहातील मुक्ता या कथेवर आधारित ‘गुंतले हृदय माझे’ हा चित्रपट सह्याद्री दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित झाला होता.
बबन पोतदार हे साताऱ्याच्या गुंफण अकादमीचे उपाध्यक्ष आहेत.
बबन पोतदार यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- मणतुर्गे, (खानापूर तालुका, बेळगाव जिल्हा) येथे १५ फेब्रुवारी २०१५ रोजी झालेल्या १२व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- महात्मा फुले यांच्या जन्मगावी खानवडी येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- शिर्डी येथे भरलेल्या सरदार वल्लभभाई पटेल साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२२ नोव्हेंबर २०१२)
- अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी समितीतर्फे देण्यात आलेला इंदिरा गांधी पुरस्कार (२४ मे २००९)
- पुणे शहरातील नगर रोडच्या रोटरी क्लबतर्फे ’रोटरी व्होकेशनल एक्सलन्स ॲवॉर्ड’ (२० फेब्रुवारी २०१५)
- पुण्याच्या उत्कर्ष महिला मंचाचा ’यशवंत पुरस्कार’ (२६-२-२०१५)
- पुण्याच्या लळित रंगभूमीतर्फे नवोदित साहित्यिकांना देण्यात येणारा पुरस्कार (१०-३-२००३)
- वत्सलाबाई अंबाडे साहित्यनिर्मिती पुरस्कार (१४-२-२०१५)