Jump to content

बनवासी

  ?बनवासी (ಬನವಾಸಿ)

कर्नाटक • भारत
—  गाव  —
मधुकेश्वर मंदिर
मधुकेश्वर मंदिर
मधुकेश्वर मंदिर
Map

१४° ३२′ ०२.७६″ N, ७५° ०१′ ०३.७२″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हाउत्तर कन्नडा
लोकसंख्या४,२६७ (२००५)
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• 581318
• +०८३८४

[[वर्ग:कर्नाटक राज्यातील शहरे व गावे]]

बनवासी हे दक्षिणी भारतातील कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नडा जिल्ह्यातील सिरसी तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव वरदा नदीच्या काठी वसले आहे. या गावाला कोंकणपुरा या नावाने देखील ओळखले जाते. हे गाव तेथील प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.

इतिहास

मधुकेश्वर मंदिर

बनवासी हे कर्नाटकातील एक सर्वात जुने गाव म्हणून परिचित आहे.

कन्नड भाषेतील आद्यकवी 'पंप' याने बनवासी येथेच साहित्यनिर्मिती केली.

कर्नाटकातील प्राचीन राजवंश 'कदंब' यांची राजधानी बनवासी येथे होती.

प्राचीन चिनी प्रवासी ह्युएनत्संग याने बनवासी गावाला भेट दिली होती. त्याने या गावाचे नाव चिनी लिपीमध्ये कोंकणपुलो असे लिहिले होते.

मधुकेश् वर मंदिराच्या प्रांगणाच्या दक्षिण ेकडील एका लहानशा दालनात दगडाचे कोरीव बेड-स्टोड अस्तित्वात आहे

भूगोल

बनवासी गावाचा परिसर जंगलांनी व्यापला आहे. बनवासी हे सिरसी नगरापासून सुमारे २३ किमी अंतरावर आहे.

शेती

बनवासी परिसर तांदूळ, ऊस, सुपारी, अननस, मसाले इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे.

विशेष बाबी

बनवासी येथील मधुकेश्वर हे ९ व्या शतकातील शिवमंदिर प्रसिद्ध आहे.

प्रतिवर्षी राज्य सरकारद्वारे येथे डिसेंबर महिन्यात 'कदंबोत्सव' आयोजित केला जातो.

चित्रे

संदर्भ

बाह्य दुवे (इंग्लिश मजकूर)