बदलापूर
?बदलापूर महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ३५.६८ चौ. किमी |
जिल्हा | ठाणे |
लोकसंख्या • घनता | १,४०,९१७ (२००४) • ३,९४९/किमी२ |
भाषा | मराठी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४२१५०३ • +त्रुटि: "९१-२५१" अयोग्य अंक आहे • एम.एच.-०५ |
संकेतस्थळ: www.badlapur.info |
बदलापूर हे महाराष्ट्र राज्यातील एक निसर्गसौंदर्याने नटलेले शहर आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी किनारी वसलेल्या या शहराला कुळगाव-बदलापूर या नावाने सुद्धा ओळखले जाते. मुंबई शहराशी बदलापूर शहर मध्य उपनगरीय रेल्वेसेवेने जोडलेले असून, दक्षिणेस वांगणी तर उत्तरेस अंबरनाथ स्थानक आहे. मुळातले बदलापूर गाव हे बदलापूर रेल्वे स्थानकापासून जवळपास ५ किलोमीटर अंतरावर आहे. आज बदलापूर शहरात जुने बदलापूर गाव, कुळगाव, मांजर्ली, बेलवली, वालवली, वडावाली, कात्रप,खरवई अशा अनेक छोट्या गावांचा समावेश आहे.तसेच बदलापुरात अनेक वृत्तपत्रे हवं आहे, त्यात प्रसिद्ध म्हणून सा.शिव दरबार,बदलापूर नामा, आदर्श बदलापुर,उल्हास विकास,विधान परिवार,विधान मित्र,असे वृत्तपत्रे आहे,शहरातील भ्रष्टाचार उघड करण्यास व त्यांना वाचा फोडण्यासाठी महत्वाची भूमिका घेतली आहे
इतिहास
शिवाजी महाराजांच्या काळात बदलापूर-सुरत मार्गे कोकण आणि गुजरात दरम्यान दळणवळणाचा रस्ता होता. उत्तम प्रजातींच्या घोड्यांसाठी हे शहर प्रसिद्ध होते. कोकण प्रदेशातल्या कठीण चढाईसाठी शिवाजी महाराजांचे योद्धे येथे घोडे बदलायचे. यावरूनच हे शहर बदलापूर या नावाने ओळखले जाऊ लागले. १९७१ साली अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर या शहरात नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.
आकर्षणे
बदलापूर परीसरातील बारवी धरण ६५.१५ मीटर उंचीचे होते मात्र आता उंची वाढवून ७३ मीटर उंच केले आहे,त्यामुळे अनेक वाड्या,पाडे यातील बाधित आदीवासी बांधवाना स्थलांतर करून सरकारी,नोकऱ्या देण्यात आले आहे,बारवी धरण हे बदलापूर स्थानकापासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असलेले एक विशाल जलाशय स्रोत आहे. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड येथील औद्योगिक वसाहतींना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २८०० ते ३००० मिमी. पावसाची नोंद होते. बारवी, ब्यारेज आणि कोंडेश्वर येथील भोज धरणांव्यतिरिक्त बदलापूर स्थानकापासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर चिखलोली धरण आहे, या धरणांच्या परिसरातील निसर्गामुळे छोट्या सहलीसाठी जवळपासच्या शहरांतून पर्यटक येथे येतात.233,070 दशलक्ष लिटरच्या थेट संचयन क्षमतेच्या 100.00% वर,बारवी धरणातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी आणि नवी मुंबईला पाणीपुरवठा केला जातो.
बदलापूर हे जांभळाच्या मधाचे दुसरे गाव विकसित करण्यात येणार आहे.[१]
प्रमुख मंदिरे
शिवमंदिर (शांतिनगर),शनी मंदिर(शनिनगर मांजर्ली) गणपती मंदिर (बदलापूर गांव), गांवदेवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, दत्तमंदिर, श्रीराम मंदिर, वडवली शिवमंदिर हनुमान मंदिर (गांधी चौक ) मारुती मंदिर (मांजर्ली गाव ), राम मंदिर (बेलवली गाव ) गावदेवी मंदिर (खरवई) एकविरा मंदिर(गांधीनगर )
हे सुद्धा पहा
- ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, बुधवार दिनांक ३१ मे २०२३