Jump to content

बडोदा संस्थान

बडोदा संस्थान
વડોદરા
इ.स. १७२१इ.स. १९४९
ध्वजचिन्ह
राजधानीबडोदा
शासनप्रकारराजतंत्र
राष्ट्रप्रमुखपहिला राजा: पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२)
अंतिम राजा: प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९४९)
अधिकृत भाषागुजराती, हिंदी, मराठी
लोकसंख्या२१२६५२२
–घनता६५६.५ प्रती चौरस किमी
बडोद्याचा राजवाडा(लक्ष्मी विलास राजमहाल)
बडोदा नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड
बडोदा संस्थानाचे चलन

बडोदा संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानाची राजधानी बडोदा ही होती. या संस्थानाची स्थापना १७२१ या वर्षी झाली.

संस्थानिक

बडोदा संस्थानाचे संस्थानिक गायकवाड घराणे होते. ते हिंदू ९६ कुळी मराठा समाजातील होते.

  • पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२)
  • दमाजीराव गायकवाड (१७३२-१७६८)
  • गोविंदराव गायकवाड (१७६८-१७७१)
  • सयाजीराव गायकवाड प्रथम (१७७१-१७८९)
  • मानाजीराव गायकवाड (१७८९-१७९३)
  • गोविंदराव गायकवाड (पुनर्स्थापित १७९३-१८००)
  • आनंदराव गायकवाड (१८००-१८१८)
  • सयाजीराव गायकवाड द्वितीय (१८१८-१८४७)
  • गणपतराव गायकवाड (१८४७-१८५६)
  • खंडेराव गायकवाड (१८५६-१८७०)
  • मल्हारराव गायकवाड (१८७०-१८७५)
  • सयाजीराव गायकवाड तृतीय (१८७५-१९३९)
  • प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९५१) - १९४७मध्ये राज्य भारतात विलीन
  • फत्तेसिंहराव गायकवाड (१९५१-१९८८) - इ.स. १९६९पर्यंत नाममात्र राजे