बडनेरा विधानसभा मतदारसंघ
बडनेरा विधानसभा मतदारसंघ - ३७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बडनेरा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील अमरावती आणि बडनेरा ही महसूल मंडळे, अमरावती महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. ६ ते १८, ३२ ते ४०, ५७ ते ६१, ७२, ७३ आणि भातकुली तालुक्यातील भातकुली आणि निंभा ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. बडनेरा हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]
अपक्ष उमेदवार रवी राणा हे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]
आमदार
वर्ष | आमदार[३] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | रवी गंगाधरराव राणा | अपक्ष | |
२०१४ | रवी गंगाधरराव राणा | अपक्ष | |
२००९ | रवी गंगाधरराव राणा | अपक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
बडनेरा | ||
उमेदवार | पक्ष | मत |
रवी राणा | अपक्ष | ७३,०३१ |
सुलभा संजय खोडके | राष्ट्रवादी | ५४,२६० |
सुधीर नारायणराव सूर्यवंशी | शिवसेना | १७,५८२ |
ऍड. मनीश मधुकरराव सावळखे | बसपा | ४,२०९ |
संजय हिरामणजी आठवले | भाबम | १,४३३ |
राजदीप राम मेघे | अपक्ष | ९१५ |
अनिरुद्ध मधुकरराव हुसे | अपक्ष | ८८० |
मेघश्याम रमेश घोंगडे (पाटील) | अपक्ष | ७८९ |
ऍड. वर्षा संजय नेरकर | अपक्ष | ६१६ |
धनराज आनंदराव मानकर | अपक्ष | ४७६ |
राजुभाऊ गजाननराव नन्नावरे | अपक्ष | ४७६ |
संदेश हरीभाऊ मोरे | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) | ३०८ |
संजय आबासाहेब जवंजाळ | अपक्ष | २४८ |
सुरेश चतुरजी पवार | शिपा | १६४ |
राहुल लक्ष्मणराव मोहोड | अपक्ष | १५६ |
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका
- रवी राणा - अपक्ष
२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका
- रवी राणा - अपक्ष
संदर्भ
- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर बडनेरा विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.