Jump to content

बटुग्रह

सेरेस

सूर्यमालेत नेपच्यूनच्या पलीकडे कायपरच्या पट्ट्यात ग्रहांसारख्या अनेक खगोलीय वस्तू फिरतात, त्यांना बटुग्रह असे म्हणतात. बटुग्रह सूर्याभोवती फिरत असले, तरीही त्यांना पुरेसे वस्तुमान नसते. सेरेस, प्लूटो, हाउमीया, मेकमेक, एरिस हे त्यांच्यापैकी काही बटुग्रह आहेत..

विद्यमान बटुग्रह

एरिस हा सर्वांत मोठा बटुग्रह आहे. त्याला ‘गॅब्रिएल ’ नावाचा उपग्रह आहे. प्लूटो हा दुसऱ्या क्रमांकाचा बटुग्रह असून, त्याला शेरॉन हा मोठ्या आकारमानाचा आणि निक्स व हायड्रा हे छोट्या आकारमानाचे उपग्रह आहेत. २००५ एफ्‌वाय९, सेदना, क्वेओअर या बटुग्रहांना उपग्रह नाहीत. २००३ईएल्‌६१ या बटुग्रहाला दोन अतिशय छोटे उपग्रह आहेत. प्लूटो या बटुग्रहाला पूर्वी ग्रहाचा दर्जा होता.