बचौर गाय
स्थिती | पाळीव |
---|---|
मूळ देश | भारत |
आढळस्थान | मधुबनी, दरभंगा, सीतामढी (बिहार) |
मानक | agris IS [१] |
उपयोग | मशागतीचा गोवंश |
वैशिष्ट्य | |
वजन |
|
उंची |
|
आयुर्मान | १८ ते २० वर्षे |
डोके | लहान डोके, रुंद आणि सपाट कपाळ |
पाय | लहान, मऊ खुर |
तळटिपा | |
ब्रिटिश भारतातील सुप्रसिद्ध गोवंश | |
|
बचौर हा एक शुद्ध भारतीय गोवंश आहे. हा मुख्यतः बिहार राज्यातील मधुबनी, दरभंगा, सीतामढी जिल्ह्यात आणि परिसरात आढळतो. हा गोवंश ब्रिटिश भारतात म्हणजे १९ व्या शतकात भारवाहू कामासाठी अतिशय प्रसिद्ध होता. या गोवंशाचे उगमस्थान सीतामढी जिल्ह्याच्या बचौर गाव आणि परिसरातील असल्यामुळे याचे नाव बचौर असे पडले आहे.
बिहार मधील कोचर आणि अहिर समाजात हा गोवंश मोठ्या प्रमाणात आढळतो. साध्यस्थितीत या गोवंशाची संख्या कमी झाल्याने हा बिहार राज्याच्या उत्तर भागात नेपाळ जवळ आढळतो.
शारीरिक रचना
याचे बहुतेक शारीरिक लक्षणे हरियाना गोवंशाशी मिळतेजुळते आहेत. हा गोवंश माफक आणि लहान आकाराचा असून, याचा रंग सहसा पांढरा किंवा राखाडी असून याच्या अंगावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. या गोवंशाचे डोके तुलनेने छोटे असून मोठे आणि सपाट कपाळ असते. या गोवंशाचे डोळे असून कान मध्यम, टोकदार आणि सावध असतात. या गोवंशाची शिंगे लहान असून बाहेरच्या बाजूला वळून सहसा खाली उतरती असतात.
या गोवंशाचे गलकंबळ किंवा पोळी तपकिरी अथवा काळ्या रंगाची असते. या गोवंशाचे वशिंड मध्यम आकाराचे असतात. पाय लहान असून याच्या खुरांचा माफक आणि नरम असतो. या गोवंशाची शेपूट लहान पण थोडी जाडजूड असते.
बैलाची सरासरी उंची १२० सेमी आणि गायीची उंची ११२ सेमी असते. तर बैलाचे सरासरी वजन २५० ते २७० किलो आणि गायीचे वजन २०० ते २५० किलो असते.
वैशिष्ट्य
या गोवंशाच्या गायी मध्यम दूधारू असून बैल कष्टकरी असतात. बैलांना वेळच्यावेळी खायला नसले तरी ते अविरत काम करतात.
राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB) निकषानुसार हा 'दुहेरी हेतूचा गोवंश' म्हणून ओळखला जातो.[२]
भारतीय गायीच्या इतर जाती
भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- Department of Animal Husbandry, Dairying & Fisheries, Government of India, New Delhi
- ICAR-Indian Agricultural Research Institute
- Cattle — Breeds of Livestock, Department of Animal Science
- Zebu Cattle of India and Pakistan. An FAO Study Prepared by N.R. Joshi ... and R.W. Phillips. [With Illustrations.]
संदर्भ
- ^ Source: Estimated Livestock Population Breed Wise Based on Breed Survey 2013. Department of Animal Husbandry, Dairying & Fisheries, Government of India, New Delhi
- ^ "Breeds | nddb.coop" (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.