Jump to content

बकुळ ढोलकिया

प्राध्यापक बकुळ हर्षदराय ढोलकिया (१५ जुलै, १९४७ - ) हे दिल्लीमधील इंटरनॅशनल मॅनेजमेन्ट इन्स्टिट्यूट या मॅनेजमेन्ट शिक्षणसंस्थेचे संचालक आहेत.[]

प्राध्यापक ढोलकियांनी १९७३ मध्ये बडोदा विद्यापीठातून अर्थशास्त्रात पी.एच.डी ही पदवी संपादन केली.[] ते ३३ वर्षे आय.आय.एम. अहमदाबादमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते.ते १९९८ ते २००१ या कालावधीत आय.आय.एम. अहमदाबादचे डिन तर २००२ ते २००७ या कालावधीत संस्थेचे संचालक होते. त्यानंतर ते डिसेंबर २०१४ पर्यंत ते भूज येथील अडानी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेन्ट या संस्थेचे संचालक होते. त्यांना अर्थशास्त्रातील आणि अध्यापनातील योगदानाबद्दल २००७ मध्ये भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरव केला.[]

शिक्षण

प्राध्यापक ढोलकियांनी बडोदा विद्यापीठातून अर्थशास्त्रात १९६७ मध्ये बी.ए, १९६९ मध्ये एम.ए तर १९७३ मध्ये पी.एच.डी पदवी संपादन केली.त्यांनी आपल्या पी.एच.डी साठी "भारतातील आर्थिक प्रगतीचे स्रोत" हा प्रबंध सादर केला.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://www.imi.edu/delhi/faculty_details/6/dr-bakul-h-dholakia
  2. ^ http://www.adani.com/Common/Uploads/VisionTeamTemplate/26_VTBiodata_Bakul%20Dholakia_bio.pdf
  3. ^ "संग्रहित प्रत". 2015-11-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-01-04 रोजी पाहिले.
  4. ^ http://books.google.co.in/books?id=DrQDAAAAMAAJ&q=books+by+bakul+dholakia&dq=books+by+bakul+dholakia&hl=en&sa=X&ei=ZHRwVN7bJYquogSY94CYBw&ved=0CCoQ6AEwAQ

वर्गःआय.आय.एम. अहमदाबादचे प्राध्यापक वर्गःआय.आय.एम. अहमदाबादचे संचालक वर्गःअर्थशास्त्राचे प्राध्यापक