Jump to content

बंड गार्डन

बंड गार्डन पुणे रेल्वे स्थानकापासून २ किमी स्थित आहे. ही बाग फिट्झगेराल्ड ब्रिजच्या शेजारी वसलेली आहे आणि मुळा नदीवरील बांध किंवा धरणावरून त्यांचे नाव घेतले आहे. []

बंडगार्डन पूल हा पुण्यातील मुळा-मुठा नदीवर बांधलेला एक पूल आहे. याचे जुने नाव फिट्झगेराल्ड पूल असे आहे. भारतातील ब्रिटिश राजवटीत इ.स. १८६७ साली हा पूल बांधला. हा दगडी आणि रुंद कमानी असलेला पुण्यातील पहिला पूल होता. या पुलाचे बांधकाम कॅप्टन रॉबर्ट एस. सेलन या अभियंत्याने केले होते. पुलाला मुंबईचे १८६७ ते १८७२ च्या दरम्यान गव्हर्नर असलेले विल्यम रॉबर्ट व्हेसी फिट्झगेराल्ड यांचे नाव देण्यात आले होते. बांधकामाला त्या वेळी दोन लाख रुपये खर्च आला होता.

पुलावर सिंहाच्या दोन दगडी प्रतिमा आहेत. पूल जुना झाल्यानंतर त्याचा वापर कमी व्हावा म्हणून २०१३ साली त्याला समांतर असा एक पूल बांधण्यात आला, त्या पुलाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले. आता या पुलावर पाश्‍चात्य देशांच्या धर्तीवर खुले कलादालन (आर्ट प्लाझा) साकारणार आहे.

चित्रदालन

१८७० मध्ये बंड गार्डन्स.
पुलावरच्या सिंहाच्या दोन प्रतिमांपैकी एक प्रतिमा
१८७५ साली दिसणारा पुलाचा देखावा

इतिहास

पारशी व्यापारी आणि परोपकारी, जमशेटजी जेजीभॉय यांनी ही छोटी धरणे,[] वंचित लोकांसाठी सिंचनाच्या पाण्याचा स्रोत म्हणून बांधली. 1869 मध्ये पूल पूर्ण झाल्यावर उद्यान उघडण्यात आले. बंड गार्डनची योजना कर्नल सेलोन यांनी केली होती, ज्यांनी टाकाऊ जागेचे बागेत रूपांतर केले,.[] आज ही बाग "महात्मा गांधी उद्यान" म्हणून ओळखली जाते

संदर्भ

  1. ^ "संग्रहित प्रत". 2016-11-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-10-04 रोजी पाहिले.
  2. ^ "Sir Jamsetjee Jeejeebhoy – Bombay's most worthy son". 2 March 2011.
  3. ^ "Bund Gardens from the Fitzgerald Bridge, Pune". 2022-10-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-10-04 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत