बंजी जम्पिंग
बंजी जम्पिंग, हे "बंगई जम्पिंग " असेही न्यू झीलंड आणि बाकी देशात लिहिले जाते.[१] या कृती मध्ये एका लांब लवचिक दोऱ्याला बांधून उंच भागावरून उडी मारली जाते. उंच भागामध्ये इमारत , पुल किंवा क्रेन अशा स्थिर वस्तूंचा समावेश होतो. किंवा हॉट एर बलुन आणि हेलिकॉप्टर अशा जमीनीच्यावर, आकाशात हलणाऱ्या अस्थिर वस्तूंचाही वापर करू शकतो. फ्री फॉलिंग आणि रिबाउंडमुळे अधिकच रोमांचक प्रसंग अनुभवता येतात.[२] जेव्हा व्यक्ती उडी मारतो तेव्हा ती लवचिक दोरी ताणली जाते आणि उडी मारणारा पुन्हा वरच्या बाजूला ओढला जातो कारण दोरी कायनेटिक ऊर्जा संपेपर्यंत वर आणि खाली हेलकावे खाते.
इतिहास
पहिली आधुनिक बंजी जंप ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी डेंजरस स्पोर्ट्स क्लबच्या डेविड कर्क आणि सिमॉन किलिंग या दोन सदस्यांकडून १ एप्रिल १९७९ मध्ये ब्रिस्टॉलमधील क्लीफटॉन सस्पेन्शन ब्रिजवरून २५० फूट (७६सेंटीमीटर ) वरून केली गेली.[३] दोघे उड्या मारणाऱ्यांना नंतर अटक केली गेली , परंतु त्यांनी यु. एस. मध्ये गोल्डन गेट ब्रिज आणि रॉयल जॉर्ज ब्रिज ( ही दॅट्स इनक्रेडिबल या अमेरिकन कार्यक्रमांतर्गत पुरस्कृत आणि प्रदर्शित केली गेली ) वरून उडी मारणे सुरू ठेवले आणि जगभरात ही संकल्पना पसरवली.
१९८२ मध्ये ते मोबाईल क्रेन आणि हॉट एर बलून मधून उडी मारू लागले होते. सुसंघटित व्यावसायिक बंजी जम्पिंग, न्यू झीलंडचा रहिवासी असलेल्या ए. जे. हॅकेटने सुरू केली, ज्याने त्याची पहिली उडी ऑकलंडच्या ग्रीनहाइथ ब्रिजवरून १९८६ मध्ये घेतली . नंतरच्या काळात हॅकेटने पूल आणि इतर अन्य उंच भागावरून बऱ्याचश्या उडया मारल्या (त्यात आयफेल टॉवरचा देखील समावेश होतो ). त्यामुळे खेळातील लोकांची आवड वाढली आणि जगातील पहिली कायमस्वरूपी व्यावसायिक बंजी साईट न्यू झीलंडच्या साऊथ आइसलॅंडमधील क्वीन्स टाऊनजवळ कावराउ गॉर्ज सस्पेन्शन ब्रिज येथे सुरू झाली.[४] हॅकेट हा सर्वात मोठा व्यावसायिक राहिला आणि काही देशांसोबत सुद्धा जोडला गेला.
१९८० पासून लाखो यशस्वी उडया घेतल्या गेल्या. ही बाब बंजी ऑपरेटर्स मार्गदर्शक सूचना काटेकोरपणे पाळून घेत असलेल्या सुरक्षा जसे की, फिटिंग्ज आणि आकडेवारीची पुनर्तपासणी; सोबत जोडली जाऊ शकते. कोणत्याही खेळामुळे इजा होऊ शकते आणि एखाद्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. जास्त लांब दोरीचा वापर हे मृत्यू होण्यास कारणीभूत असणे सामान्य कारण असते. दोरी ही उडी मारण्याच्या जागेच्या उंचीपेक्षा लहान असायला पाहिजे त्यामुळे तिला ताणली जाण्यासाठी जागा मिळते आणि ती ताणली जाते तेव्हा दोरीमधील ताण अधिकाधिक वाढत जातो. सुरुवातीला ताण हा उडी मारणाऱ्याच्या वजनापेक्षा कमी असतो आणि उडी मारणारा खालच्या दिशेला जातो आणि जेव्हा दोरीमधला ताण उडी मारणाऱ्याच्या वजना इतका होतो तेव्हा त्याचा प्रवेग तात्पुरता शून्य होतो आणि दोरी पुढे ताणली गेल्यामुळे उडी मारणारा वरच्या दिशेला जातो आणि परत वर जाण्याआधी एका वेळी त्याचा उभा वेग शून्य होतो.
१९९० मध्ये फेस अँड्रेनॅलीनने आफ्रिका खंडाला बंजी उडीची ओळख करून दिली, तेव्हा आफ्रिकेतील ब्लॉऊक्रांस रिव्हर ब्रिज पहिला पुल होता जेथून बंजी ऊडी घेतली गेली. नंतर १९९७ पासून फेस अँड्रेनॅलीनकडून हा ब्लॉऊक्रांस रिव्हर ब्रिज पुल व्यवसायिकरित्या बंजी उडीसाठी वापरला जातो आणि हा बंजी उडीसाठी व्यवसायिकरित्या वापरला जाणारा सर्वात उंच पुल आहे. एप्रिल २००८ मध्ये एका ३७ वर्षीय दुरबन शहरातील एका ३७ वर्षीय कार्ल मॉस्क दियोनीसीओ या माणसाने १८,५०० कॉंडोम्सपासून बनवलेली दोरी वापरून ३० मी. (१०० फुट ) उंच टॉवर वरून उडी घेऊन बंजी उडी मध्ये इतिहास निर्माण केला.
बंजी बंजी हा शब्द दक्षिणेकडील देशांमधल्या इंग्रजी भाषेमधून अस्तित्वात आला त्याचा अर्थ जेम्स जेनिंगने त्याच्या १८२५ मध्ये प्रकाशित झालेल्या "ओब्सेर्वशन्स ऑफ सम ऑफ द डायलेक्टस इन द वेस्ट बंगाल " या पुस्तकात दिल्याप्रमाणे "जाड असलेले काहीही " असा होतो.
संदर्भ
- ^ "फूकेट लॅंड ऍक्टिव्हिटीस". १७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बंगी जम्पिंग कॉर्ड डिझाईन उसिंग ए सिम्पल मॉडेल". १७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "वर्ल्ड'स 'फर्स्ट' बंगी जंप इन ब्रिस्टॉल कॅप्टचेर्ड ऑन फिल्म". १७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "थिंग्जस टू डू इन क्विंन्सटाउन - कवराऊ ब्रिज बंगी (४३मी)". 2017-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.