फ्लिपकार्ट
फ्लिपकार्ट ही भारतातली एक अग्रणीय इ-कॉमर्स अथवा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य कंपनी असून तिचे मुख्यालय बंगळूरू, कर्नाटक येथे आहे. फ्लिपकार्टची स्थापना सचिन बन्सल व बिन्नी बन्सल यांनी सन २००७ मध्ये केली आहे. सुरुवातीच्या काळात फ्लिपकार्टने आपले लक्ष विविध पुस्तके विकण्यात केंद्रित केले होते परंतु आता ते वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादींची विक्री करते.