Jump to content

फ्रीडरिश पॉलस

फील्ड मार्शल फ्रीडरीश विल्हेम अर्न्स्ट पॉलस (२३ सप्टेंबर, १८९०:गुक्सहागेन, प्रशिया - १ फेब्रुवारी, १९५७, ड्रेस्डेन , पूर्व जर्मनी) हा नाझी जर्मनीचा उच्च सेनापती होता.

१९४२मध्ये सोवियेत संघावरील आक्रमणात भाग घेतला होता व त्याअंतर्गत स्टालिनग्राडला वेढा घातला होता. स्टालिनग्राडच्या वेशीवर झालेल्या घनघोर लढाईत पॉलस जर्मन सैन्याचा सेनापती होता. या लढाईत दोन्ही पक्षांचे अतोनात नुकसान झाले. शेवटी सोवियेत संघाच्या सैन्याने प्रतिहल्ला चढवीत जर्मन सैन्यालाच वेढले आणि पॉलसला शरण येण्यास भाग पाडले.

पॉलस शरणागती पत्करणार असे कळल्यावर ॲडॉल्फ हिटलरने त्याला फील्ड मार्शल पदावर बढती दिली. तोपर्यंत जर्मनीच्या एकही फील्ड मार्शल शत्रूच्या हाती जिवंत लागलेला नव्हता. पॉलसला बढती देण्यामागे त्याने लढून मरावे किंवा आत्महत्या करावी असा हिटलरचा गूढ संदेश होता. बढती मिळाल्यावर दोनच तासांत पॉलस आपल्या सगळ्या सैन्यासह सोवियेत संघाला शरण गेला.