फ्रान्सची लढाई
बॅटल ऑफ फ्रांस ही दुसऱ्या महायुद्धातील नाझी जर्मनी आणि फ्रांसमधील लढाई होती. सप्टेंबर १९३९ ते जून १९४० दरम्यान झालेल्या या लढाईत जर्मनीने फ्रांसवर पूर्णपणे वर्चस्व मिळविले.
१ सप्टेंबर, १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यावर फ्रांसने ३ तारखेला जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. येथून अधिकृतपणे सुरू झालेली ही लढाई जवळपास आठ महिने धुमसत राहिली. १० मे, १९४० पासून जर्मनीने फ्रांसवर धडक मारीत जून अखेरपर्यंत थेट फ्रांसच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंतचा प्रदेश काबीज केला.
१९४४मधील दोस्त राष्ट्रांच्या नॉर्मंडीवरील आक्रमणापर्यंत जर्मनीचे फ्रांसवर पू्र्णपणे आधिपत्य राहिले.