Jump to content

फ्रांसेस आर्नोल्ड

फ्रांसेस हॅमिल्टन आर्नोल्ड (२५ जुलै, १९५६:एजवूड, ॲलिघेनी काउंटी, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) या अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, जैवरसायनशास्त्रज्ञ आणि जैविक अभियंता आहेत. या कॅलटेक येथे रसायशास्त्राच्या लायनस पॉलिंग प्राध्यापिका आहेत. त्यांच्या एन्झाइम[मराठी शब्द सुचवा]बद्दलच्या संशोधनासाठी त्यांना २०१८ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

फ्रांसेस आर्नोल्ड


लहानपण आणि शिक्षण

आर्नोल्ड यांचा जन्म आणि लहानपण पिट्सबर्गच्या उपनगरांमध्ये गेले. त्यांचे वडील विल्यम हॉवर्ड आर्नोल्ड अणुभौतिकशास्त्रज्ञ होते तर त्याच नावाचे आजोबा दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेचे सेनाधिकारी होते. माध्यमिक शिक्षण घेत असताना फ्रांसेस आर्नोल्ड यांनी घर सोडून मजलदरमजल करीत वॉशिंग्टन डी.सी. गाठले व तेथे व्हियेतनाम युद्धाविरुद्धच्या आंदोलनात भाग घेतला. त्यांनी त्यावेळी डी.सी.मध्ये कॉकटेल वेट्रेस[मराठी शब्द सुचवा] आणि टॅक्सीचालक म्हणून काम करून स्वतःचा निर्वाह केला.

आर्नोल्ड यांनी १९७९मध्ये प्रिन्सटन विद्यापीठातून यांत्रिकी आणि एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये बी.एस.ची पदवी मिळवली. त्यात त्यांचा सौर उर्जेवर विशेष भर होता. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली मधून रसायनशास्त्रात पी.एचडी. पदवी मिळविली.

हे सुद्धा पहा