Jump to content

फ्रांसिस्को मोराझान

फ्रांसिस्को मोराझान (३ ऑक्टोबर, इ.स. १७९२:तेगुसिगाल्पा, होन्डुरास - १५ सप्टेंबर, इ.स. १८४५:सान होजे, कॉस्टा रिका) हा मध्य अमेरिकेच्या प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष होता. याशिवाय तो होन्डुरास, कॉस्टा रिका आणि एल साल्वादोरचा राष्ट्रप्रमुख होता.

मध्य अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असताना याने देशात अनेक बदल घडवून आणले. यात अभिव्यक्तीस्वातंत्र्य, वृत्तपत्रांना दिलेले स्वातंत्र्य तसेच धर्मापासून सरकारला वेगळे ठेवणे यांचा समावेश होतो. राजकारणी मोराझान चतुर सेनापतीही होता. मध्य अमेरिकेतील देशांवर त्याचा मोठा प्रभाव आहे.

१८४२ च्या सप्टेंबरमध्ये कॉस्टा रिकाच्या सान होजे शहरात पोर्तुगीजांच्या चिथावणीने सुमारे १,००० सैनिकांनी मोराझानच्या ४० सैनिकांवर हल्ला केला. चार दिवस लढल्यावर मोराझानने तेथून पळ काढला परंतु त्याच्या मित्रांनी त्यास दगा दिला व मोराझानला शत्रूच्या हवाली केले. मोराझान व त्याच्या इतर सेनापतींना गोळ्या झाडून ठार मारण्यात आले.