फ्रांसचा तिसरा हेन्री
तिसरा हेन्री Henry III | |
फ्रान्सचा राजा | |
कार्यकाळ १३ फेब्रुवारी १५७४ – २ ऑगस्ट १५८९ | |
मागील | नववा चार्ल्स |
---|---|
पुढील | चौथा हेन्री |
जन्म | १९ सप्टेंबर १५५१ |
मृत्यू | २ ऑगस्ट १५८९ (वयः ३७) |
व्हालव्हाचा अलेक्झांदर-एदुआर्द तथा हेन्री तिसरा (सप्टेंबर १९, इ.स. १५५१:सीन-एत-मार्न - ऑगस्ट २, इ.स. १५८९:हौ-दि-सीन) हा इ.स. १५७३ ते इ.स. १५७४ पर्यंत पोलंडचा व फेब्रुवारी १३, इ.स. १५७४ ते मृत्युपर्यंत फ्रांसचा राजा होता.
हेन्री हा हेन्री दुसरा व मेदिचीची कॅथेरिन यांचा चौथा मुलगा होता. राजा होण्याआधी त्याने काही लढायात भाग घेतला होता. इ.स. १५७३मध्ये पोलंडने याला आपला राजा निवडला. दोन वर्षे राज्य केल्यावर हेन्रीचा भाउ फ्रांसचा राजा चार्ल्स नववा मृत्यु पावला. पोलंडच्या धर्मनिरपेक्षतेला कंटाळलेल्या हेन्रीने तेथून पळ काढला व फ्रांसला परतला. तेथे त्याला राजेपदी बसवले गेले.
याच दिवशी हेन्रीचे लग्न लुइस दि लॉरॅं-व्हॉदेमोॅंशी झाले परंतु हेन्री स्त्रैण होता व त्यांना मुले झाली नाहीत.
मे १२, इ.स. १५८८ रोजी ग्विसच्या सैन्याने पॅरिसवर हल्ला केला. यावेळी हेन्रीने पॅरिस सोडले. पॅरिसवर प्रतिहल्ला करायच्या बेतात असलेल्या हेन्रीला एका गुप्तहेराने संदेश द्यायच्या निमित्ताने पोटात सुरा खुपसुन ठार मारले.
हे सुद्धा पहा
मागील चार्ल्स नववा | फ्रान्सचे राजे फेब्रुवारी १३, इ.स. १५७४ - ऑगस्ट २, इ.स. १५८९ | पुढील हेन्री चौथा |
मागील झिगमंट दुसरा | पोलंडचे राज्यकर्ते इ.स. १५७३ - इ.स. १५७४ | पुढील ऍना व स्टीवन बॅटोरी |