Jump to content

फेमिनिस्ट रिसर्च मेथोडोलॉजी (पुस्तक)

फेमिनिस्ट रिसर्च मेथोडोलोजी : मेकिंग मिनिंग ऑफ मिनिंग मेकिंग[] हे मैथ्री विक्रमसिंघे[] द्वारा लिहिलेले पुस्तक असून २०१४ मध्ये जुबान प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाले. हे पुस्तक स्वतःला दक्षिण आशियाई देश श्रीलंके मध्ये स्थापित करते.

मुख्य युक्तिवाद/पद्ध्तीशास्त्र

स्त्रीवादी पद्धतीशास्त्रावर भाष्य करण्यासाठी ते पद्धतीशास्त्राच्या दृष्टीकोनातून, यष्टी पद्धतीचा (case study approach) वापर करून स्त्री अभ्यास/ संशोधन चळवळीचा शोधात्मक सैद्धांतिक अभ्यास करतात. या पुस्तकात लेखिका स्त्रीवादी पद्धतीशास्त्राचे विविध पद्धती, सिद्धांत, सत्संबंधीशास्त्र (ontology), ज्ञानमीमांसाशास्त्र, नैतिकता व राजकारणाचा शोध व विश्लेषण करू पाहतात. वरील उद्देशास साध्य करण्यासाठी लेखिका इतर संशोधन व लिखाणाचा अभ्यास करतात. त्याद्वारे श्रीलंकेतील स्त्रीवादी संशोधक कार्यकर्त्या कशा पद्धतीने व साधनांद्वारे स्त्रियांचे जीवन जगतात, त्याची पकड घेतात व त्याचे प्रतिनिधित्व करतात व त्यामाध्यमातून संशोधनाद्वारे स्त्रियांचे व समाजाचे अनेक सत्य घडवतात याकडे लेखिका लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. संशोधक कशा पद्धतीने सत्याचे अर्थ लावतात व त्याद्वारे वैयक्तिक व सामाजिक बदलासाठी राजकीय, सैद्धांतिक व नैतिक जबाबदारी पार पाडतात हे लेखिका शोधण्याचा प्रयत्न करतात.

विभागनिहाय पुस्तकाची मांडणी

हे पुस्तक २ भागांमध्ये विभागलेले आहे. पुस्तकातील पहिल्या भागात लेखिका श्रीलंका व जगभरात पद्धतीशास्त्राबाबातीतील समाज व व्यवहारामागील पार्श्वभूमी प्रदान करतात. तर दुसऱ्या भागात लेखिकेला जे स्त्रीवादी पद्ध्तीशास्त्राच्या सहा बाजू वाटतात, क्रमशः संशोधनकर्त्याची व्यक्तीनिष्ठता, सत्संबंधीशास्त्र( ontology), ज्ञानमिमांसाशास्त्र, पद्धती, सिद्धांत व नैतिकता/राजकारण. पहिल्या प्रकरणात विक्रमसिंघे या श्रीलंकेतील संशोधनाची पार्श्वभूमी समजण्यासाठी फुकोल्टच्या (१९७२) लवचिक संकल्पनात्मक साधन -'अर्थ लावणे -पुरातत्त्वशास्त्र(making meaning-archaeology) याच्या मदतीने श्रीलंकेतील स्त्री अभ्यास व स्त्रीवादी संशोधनातील चळवळीशी ओळख करून देतात. हे साध्य करण्यासाठी त्या १९७५ ते वर्तमानापर्यंतची श्रीलंकेतील स्त्रीवादी संशोधन व लेखनाला घडवतात , त्याचा शोध घेतात व त्याचा एक ढाचा देतात, स्त्री चळवळ व संशोधनकर्त्यांची ओळख करून देतात, संशोधन निर्मितीचे अर्थकारण व प्रत्यक्ष जमिनीवरील राजकारणाचा वेध घेतात व स्त्रीवादी संशोधन चळवळीतील ज्ञानमीमांसाशास्त्रात्मक व सैद्धांतिक मुद्यांना हात लावतात.

दुसऱ्या प्रकरणात जगभरात ज्ञान निर्मितीच्या पद्धतीत व ज्ञानमीमांसाशास्त्रात स्त्री या कोटीक्रमाने कसा बदल घडवून आणला याचा आढावा या प्रकरणात घेण्यात आला आहे. स्त्रीयांला एक नमुन्याच्या स्वरूपात बघून संशोधन क्षेत्रात कुठले महत्त्वाचे बदल घडले याला अधोरेखित करून त्या श्रीलंकेतील स्त्री अभ्याससंशोधन चळवळीला एक ज्ञानमीमांसाशास्त्राची पार्श्वभूमी देऊ पाहतात.

तिसऱ्या प्रकरणात विक्रमसिंघे या स्त्रीवादी संशोधन पद्धतीशास्त्राच्या संकल्पीकरणात व्यक्तीनिष्ठ्तेची अपरिहार्यता मांडतात. तसेच संशोधनात व्यक्तीनिष्ठता आणण्यासाठी परवर्तिततेचे (reflexivity) महत्त्व मांडतात. या प्रकरणात हे पुस्तक लिहिण्याची व संशोधनाच्या प्रक्रियेवर लेखिका परावर्तन करतात. अनेक मांडणी व परिणाम ज्यामध्ये लेखिकेचे कार्य घडले/ स्थापित आहे, अर्थ लावण्याची प्रक्रिया, विशिष्ट सैद्धांतिक मांडणी स्वीकारण्याची कारणं, ज्ञानमिमांसाशास्त्र, सत्संबंधीशास्त्र(ontology), संशोधन पद्धतीचे समर्थन त्या या परावर्तनाच्या प्रक्रियेत करतात व शेवटी माहितीचे विश्लेषण व सैद्धांतीकरणावर भाष्य करतात.

प्रकरण ४ मध्ये लेखिका सत्संबंधीशास्त्रावर (ontology) भाष्य करतात. ज्या स्थानिक परिस्थिती किंवा जगण्याची परिस्थिती संशोधनकर्त्यांच्या मनात खदखदते किंवा ज्यात ते भाग घेतात, त्यावर लेखिकेनी भर दिलेला आहे. यामध्ये संशोधन करताना समोर येणारे विविध स्पर्धात्मक सत्य किंवा सत्संबंधीशास्त्रासंबंधीचे राजकारणाचा समावेश आहे. सत्संबंधीशास्त्रासंबंधीचे राजकारणामध्ये १) आंतरराष्ट्रीय प्रभाव/ कायद्याचे मापदंडांचा प्रभाव, २) विद्याशाखा व संस्थांमध्ये लिंगभावाचे मुख्यप्रवाहीकरणाचे ज्ञानमीमांसाशास्त्र, ३) समकालीन सामाजिक -राजकीय बदल, ४) संशोधनकर्त्याचे आंतरिक वैयक्तिक राजकीय प्रेरणांचा समावेश आहे. येथे लेखिका मांडतात कि संशोधनाची सत्संबंधीशास्त्राचे राजकारण हे संशोधनाच्या ज्ञानमीमांसाशास्त्राचे प्रतिकात्मक स्वरूप आहे.

प्रकरण ५ संशोधनातील एक सबळ ज्ञानमीमांसाशास्त्र - लिंगभावावर केंद्रित आहे. यामध्ये लेखिका लिंगभावासंदर्भातील सत्य किंवा लिंगभावात्मक जगणे किंवा असणे हे एकाबाजूला ज्ञानमीमांसाशास्त्राचे एक घटक आहे तसेच लिंगभाव समजून घेण्याची एक पद्धती आहे.

प्रकरण ६ मध्ये विक्रमसिंघे संशोधन पद्धतीकडे स्वतःचे लक्ष केंद्रित करतात. येथे त्या साहित्याच्या आढाव्याला एक संशोधन पद्धती म्हणून मांडतात. त्यांच्या मते साहित्याच्या आढावा हे माहिती गोळा करण्यासाठी किंवा विषयाला पार्श्वभूमी देण्यासाठी एक भिन्न अशी संशोधन कृती तर आहेच पण तसेच संशोधन विषयाच्या उत्क्रांतीचे प्रतिनिधित्व किंवा जडण-घडण सुद्धा आहे. त्यामुळे साहित्याच्या आढाव्याला चिकित्सा म्हणून नाही तर अर्थ लावण्याची एक पद्धत म्हणून बघितलेले आहे.

सातवे प्रकरण हे लेखिकेच्या सैद्धांतीकरणाचा गाभा आहे. या प्रकरणात लेखिका पद्धतीशास्त्रावरील सैद्धान्तिकरण मुख्यतः संशोधनकर्त्यांच्या मुलाखतींच्या आधावारावर करते पण जेथे स्थानिक परिस्थितीला साजेसे असेल तेथे पाश्चिमात्यांच्या सैद्धांतीकरणाला सूक्ष्मपणा आणून सुधा केलेला आहे. व येथे लेखिका मांडतात कि संशोधनात अर्थ लावणे याचा अर्थ प्रक्रियेला पूर्णपणे समजण्यासाठी आधुनिक व उत्तर आधुनिक दृष्टिकोनाच्या मिश्रणाचे स्वीकार असा आहे.

प्रकरण ८ हे अंतिम प्रकरण असून श्रीलंकेतील संशोधन प्रक्रियेचे राजकीय व नैतिक परिणाम काय आहेत याबाबतीतील संशोधनकर्त्यांच्या चिंतेवर लेखक मांडणी करतात. त्यांच्या मते एक स्त्रीवादी होण्याच्या नात्यांनी संशोधन प्रक्रियेत राजकारण व नैतिकता यांची घट्ट वीण घालणे गरजेचे आहे.

संदर्भ सुची