Jump to content

फूलबसन बाई यादव

फूलबसन बाई यादव (जन्म : धनगांव, राजनांदगाव, छत्तीसगड-भारत, ५ डिसेंबर, १९६९; - ) या एक भारतीय समाजसेविका आहेत. यादव यांचे लग्न दहाव्या वर्षीच लावून देण्यात आले व त्यांनी सातव्या इयत्तेनंतर शाळा सोडली होती.

या मां बमलेश्वरी जनहित करे समिती या संस्थेच्या संस्थापिका असून त्याद्वारे त्या छत्तीसगढमधील गरीब व दलित महिलांची मदत करतात. या संस्थेचे अंदाजे २,००,००० सदस्य असून दरमहिना दोन रुपये वर्गणी घेऊन त्यांनी १५ कोटी रुपये उभे केले आहेत. ही संस्था हे पैसे लसीकरण, बालसंगोपन केंद्र आणि इतर अनेक समाजसेवी उपयोगांसाठी वापरते.