फुलसिंग नाईक
फुलसिंग चतुरसिंग नाईक (1856-1960) हे दक्षिण मध्य भारतातील थोर समाजसुधारक असून हरितक्रांती , श्वेतक्रांतीचे जनक असलेले महानायक वसंतराव नाईक यांचे पिताश्री होत. गोरराजवंशी कुळातील असून त्यांचे गोत्र रणसोत होते. मुघलांच्या आक्रमणानंतर जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे मारवाड (राजपुताना) मधून हे कुटुंब विस्तापित झाल्यानंतर वराडमधील पुसद जवळील डोंगर माळरानावर त्यांनी आपले बस्तान बसवून गहुलीगड हे स्वतंत्र वसाहत वसविले. या भयाण संघर्षाच्या काळातही चतुरसिंग नाईकांनी आपल्या गोरराजवंशी समुदायाला सोबत घेऊन सामना करावा लागला. हा सामाजिक वारसा पुढे फुलसिंग नाईकांनी जपला.
"शिक्षणाशिवाय समाज उन्नत होणे शक्य नाही, असे फुलसिंग नाईक अत्यंत वृद्धापकाळी सुद्धा माझ्याजवळ डोळ्यात पाणी आणून सांगताना मी पाहिले आहे." असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गौरव ग्रंथात फुलसिंग नाईक बाबत मांडले आहे. [१] त्यांच्या कार्याला आदरांजली म्हणून फुलसिंग नाईक महाविद्यालयाची सन १९६० मध्ये स्थापना करण्यात आली.
फुलसिंग नाईक अशिक्षित जरी होते, परंतु त्यांना काळाची जाण होती. त्यामुळे शिक्षणाचे आणि समाजसुधारणेचे महत्त्व त्याकाळी आपल्या समुदायाला पटवून देत. समाजसुधारणेसाठी त्याकाळी फुलसिंग नाईक यांनी म्हैसूर, खांदेश, वराड अशा विविध भागातील तत्कालीन समाजधुरीणांची मोट बांधण्यातही मोलाचे योगदान दिले.
संदर्भ
- ^ "तुकडोजी महाराजांचा आशीर्वाद". लोकराज्य. ९: २. डिसेंबर २०१२.